esakal | लॉकडाउनची वेळ आणलीच ! तरूणही कोरोनाचे बळी; आज 913 पॉझिटिव्ह; 23 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

21Corona_20akola_2001_1_2.jpg

ठळक बाबी... 

 • शहरात आज आढळले 272 पॉझिटिव्ह; 14 जणांचा मृत्यू 
 • ग्रामीण भागात 641 नवे रूग्ण; नऊ जणांचा कोरोनाने घेतला बळी 
 • नियमांचे पालन तंतोतंत न केल्यानेच वाढला कोरोना; मास्क, सोशल डिस्टन्सिंग आता तरी ठेवा 
 • आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील नऊ लाख 21 हजार 630 संशितांची झाली कोरोना टेस्ट 
 • शहर-जिल्ह्यातील रूग्णसंख्या 72 हजार 138; मृतांची संख्या दोन हजार 131 झाली 
 • शहरातील तीन हजार 763 तर ग्रामीणमधील पाच हजार 322 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
लॉकडाउनची वेळ आणलीच ! तरूणही कोरोनाचे बळी; आज 913 पॉझिटिव्ह; 23 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील कोरोना आता सुसाट असून विषाणूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. नागरिकांना प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्यानेच आता संपूर्ण राज्य लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचे संकट उपचारातून जेवढे बरे होते, तेवढेच नियमांचे पालन तंतोतंत केल्यास त्याची साखळी खंडीत होऊ शकते. त्यामुळे आता तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करायलाच हवे. आज शहरात 272 रूग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आज 641 रूग्ण आढळले असून नऊजणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

 • शहरात आज आढळले 272 पॉझिटिव्ह; 14 जणांचा मृत्यू 
 • ग्रामीण भागात 641 नवे रूग्ण; नऊ जणांचा कोरोनाने घेतला बळी 
 • नियमांचे पालन तंतोतंत न केल्यानेच वाढला कोरोना; मास्क, सोशल डिस्टन्सिंग आता तरी ठेवा 
 • आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील नऊ लाख 21 हजार 630 संशितांची झाली कोरोना टेस्ट 
 • शहर-जिल्ह्यातील रूग्णसंख्या 72 हजार 138; मृतांची संख्या दोन हजार 131 झाली 
 • शहरातील तीन हजार 763 तर ग्रामीणमधील पाच हजार 322 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 


कोरोनाचे सर्वाधिक बळी को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रूग्ण) तसेच ज्येष्ठ नागरिक ठरले आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांनाही कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली असून आज शहरातील मुरारजी पेठ (पाटील चाळ) येथील 33 वर्षीय पुरुषाचा तर हरिदास वेसेतील (पंढरपूर) 36 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच उर्वरित 17 मृत रुग्ण 55 वर्षांवरील आहेत. कोरोनाची वर्षपूर्ती होत असतानाच शहरातील टेस्टिंगचे प्रमाण म्हणावे तितके वाढले नसून आता सिंहगड कॉलेज, वाडिया, बॉईज हॉस्पिटल, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बेड हाउसफूल्ल झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला, हात-पाय गळणे अशी लक्षणे असलेल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बेड मिळत नसल्याची स्थिती शहरात पहायला मिळत आहे. परंतु, संशयितांकडून उपचारासाठी दाखल होण्यास विलंब लावला जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करणे आणि वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय रूग्ण वाढ
पंढरपूर (111), माळशिरस (131), बार्शी (96), माढा (84), मंगळवेढा (79), करमाळा (53), सांगोला (51), मोहोळ (29), दक्षिण सोलापूर (5), अक्‍कलकोट (2) असे नवे रूग्ण आढळले आहेत. आज दिलासादायक बाब म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्‍यात एकही रूग्ण आढळला नाही.