फूड ट्रे मार्फत गरजवंतांना जय हिंदतर्फे सुरक्षित अन्नदान

 Jai Hind donates safe food to the needy through food trays
Jai Hind donates safe food to the needy through food trays
Updated on

सोलापूर : आपल्याबरोबर समाजाची व प्रत्येक नागरिकाची काळजी घेणे सर्वांना बंधनकारक आहे. मग हा नियम बेघर व गरजवंतांना अन्नदान करतानाही लागू आहे. यावर तोडगा म्हणून जय हिंद फूड बॅंक व्हॅनसोबत ट्रे साथीला आला. यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता गरजवंतांना जेवण दिले जात आहे. 


अन्नपूर्णा फाउंडेशन संचलित जय हिंद फूड बॅंकेच्या माध्यमातून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या 70 दिवसांपासून दररोज 650 ते 700 गरजू व बेघर लोकांना जेवण दिले जात आहे. हे सामाजिक कार्य करत असताना प्रत्येक सदस्याचा जीव टांगणीला लागलेला असतो. कधी कुणाच्या संपर्कात आल्यावर कधी या महाभयंकर रोगाची लागण होईल, याची कल्पना न केलेली बरी. अशा परिस्थितीतसुद्धा जय हिंदने दोन महिन्यांपासून योग्य ती काळजी घेत, सुरक्षा साधने वापरत हे कार्य चालू ठेवले आहे. 


एक वेळ अशी होती, की आपल्या हाताने या भुकेल्यांना घास भरवला जात होता, पण आज त्यांना लांबून जमिनीवर ठेवून जेवण द्यावे लागत आहे. एकीकडे शासनाचे नियम पाळणे आवश्‍यक आहे आणि दुसरीकडे गरजूंना जमिनीवर ठेवून जेवण देणे, हे जय हिंदचे संस्थापक सतीश तमशेट्टी यांना पटले नाही. यावर तोडगा म्हणून त्यांना एक संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेतून जय हिंद फूड बॅंक व्हॅनसाठी फूड ट्रे साथीला आला. हा ट्रे मुव्हेबल असून वापर झाल्यानंतर ते सॅनिटायझ करून काढून ठेवता येतो. व्हॅनमधून खिडकीची काच लावून जेवण ट्रेमधून देता येते आणि देत असताना मागील बाजूस खिडकीतून ट्रेमध्ये फूड पॅकेट ठेवल्यास ते खाली सरकत खालच्या ट्रेमध्ये जमा होतात. त्या ट्रेमधून गरजवंत त्याला लागेल तेवढे अन्न घेऊन पुढे जातो. यामध्ये जो खालचा ट्रे आहे तो आणि खिडकीमधील अंतर जवळपास चार फुटांपर्यंत ठेवण्यात आले आहे. 

फूड ट्रेचे फायदे 

  • कोणाच्याही संपर्कात न येता जेवण देऊ शकतो. 
  • गरजवंत पुरेल तितके अन्न स्वतःच्या हाताने घेऊ शकतात. 
  • गर्दी टाळून जेवण देऊ शकतो. 
  • सोशल डिस्टन्स राखला जातो. 
  • फूड व्हॅनमधून खाली न उतरता अन्न देऊ शकतो. 
  • सॅनिटायझ करण्यासाठी अगदी सोपं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com