भाजप जिल्हाध्यक्षांच्या शर्यतीतून कल्याणशेट्टींची माघार 

भाजप जिल्हाध्यक्षांच्या शर्यतीतून कल्याणशेट्टींची माघार 
Updated on

सोलापूर  ः भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड आठवडाभरात होण्याची शक्‍यता आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या चर्चेत जरी माझे नाव असले तरी मला ती जबाबदारी नको असे मी पक्षाला सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदी अण्णाराव बाराचारे यांची नियुक्ती करावी, यासाठी आपणच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह धरल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, जिल्हाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती. पण, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून माझ्याकडे ती जबाबदारी देऊ नका असे त्यांना सांगितले आहे. मी नवखा आमदार आहे. त्यामुळे मला माझ्या मतदारसंघात वेळ द्यायचा आहे. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, त्या पूर्ण करणे आवश्‍यक असल्याबाबत मी पाटील यांना सांगितले आहे. 

जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदाच्या विषयावर बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, हे पद जरी असंवैधानिक असले तरी प्रथा-परंपरेनुसार ते चालत आले आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी आनंद तानवडे यांना पक्षनेते करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पत्र दिले होते. त्यावेळी पवार यांचे पत्र चालले. मात्र, आताच्या निवडणुकीत त्यांचे पत्र चालत नसल्याचे सांगितले गेले. हे योग्य आहे का? बाराचारे यांना पक्षनेतेपद मिळावे यासाठी आपण प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरला. ते माझ्या मतदारसंघातील आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत त्यांनी पक्षाचे काम चांगले केल्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रह धरला. प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत झालेल्या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांनीही मदन दराडे यांच्यासाठी या पदाची मागणी केली. त्यावेळी उर्वरित सव्वा वर्षासाठी दराडे यांना पक्षनेते करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com