सोलापुरात सारी रोगाच्या आजाराने एकाचा मृत्यू
सोलापूर ः कोरोनाचे दोन बळी गेल्यानंतर आता आज (मंगळवारी) सारीच्या आजाराने एका 75 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. आज दिवसभरात एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी चार रुग्ण सारीचे असल्याचे उघड झाले आहे. अद्यापही 197 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली
दरम्यान, सारी आणि कोरोना या दोन्ही आजाराची लक्षणे सारखीच आहेत. ज्या व्यक्तीचा मृत्यू श्वसन संस्थेचा त्रास असल्याने झाला आहे व तो व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला नाही असा व्यक्ती सारीबाधित समजला जातो. सोलापूरमधील सारी व कोरोना या बाबतची सविस्तर माहिती उद्या (बुधवारी) जिल्ह्यातील नागरिकांना दिली जाईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की संबंधित वृद्धामध्ये सारीची लक्षणे दिसून आल्यामुळे 19 एप्रिलला सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 20 एप्रिलला त्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल 20 एप्रिलला रात्री आला. पण त्यापूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आज नव्याने आढळून आलेल्या पाच व्यक्तींमध्ये चार रुग्ण हे सारखे आहेत एक रुग्ण हा रविवार पेठेतील रुग्णाशी संबंधित आहे.
आज आढळलेल्या पाच रुग्ण हे मोदीखाना, शास्त्रीनगर, जोशी गल्ली, शनिवार पेठ, मदर इंडिया झोपडपट्टी या परिसरातील आहेत. आतापर्यंत 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यापैकी तीन मृत आहेत तर उर्वरित 27 जण हे सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
सोलापुरात 12 एप्रिलपर्यंत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. परंतु गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या 30 वर तसेच मृतांची संख्याही तीनवर पोचली आहे. त्यामुळे सोलापूर रेडझोनमध्ये आले आहे. सोलापूर शहरातील कंटेनमेंटच्या संख्येतही वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोलापूर शहरासाठी चार दिवस पूर्ण कडक बंदी करण्यात आली आहे.
कंटेनमेंटमध्येही वाढ
सोमवारपर्यंत सोलापूर शहरातील सहा ठिकाणे कंटेनमेंट करण्यात आली होती. त्यामध्ये आज तीन ठिकाणांची भर पडली आहे. त्यात मदर इंडिया झोपडपट्टी, मोदीखाना, शास्त्रीनगर या भागांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत रुग्णांची संख्या 25 होती. त्यामध्ये आज पाचची भर पडल्याने ती तीसवर गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.