सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तरुणांनी पुढाकर घेतला अन्‌ सर्व गावच...

अण्णा काळे
रविवार, 31 मे 2020

सोलापूर जिल्ह्यात दिवसांदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेळे प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र, करमाळा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. पुणे, मुंबईसह बाहेर जिल्ह्यातून व गावातून येणाऱ्या नागरिकांमुळे रुग्ण येण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे नागरिकही सजग झाले आहेत. यातूनच करमाळा तालुक्यातील कोळगावमधील तरुणांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वच नागरिकांची तपासणी करुन घेतली आहे.

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात दिवसांदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेळे प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र, करमाळा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. पुणे, मुंबईसह बाहेर जिल्ह्यातून व गावातून येणाऱ्या नागरिकांमुळे रुग्ण येण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे नागरिकही सजग झाले आहेत. यातूनच करमाळा तालुक्यातील कोळगावमधील तरुणांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वच नागरिकांची तपासणी करुन घेतली आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोळगाव (ता. करमाळा) येथील युवक, ग्रापंचायत, आशा स्वयंसेविका यांनी गावातील नागरीक, वयोवृद्ध, लहान मुले यांची घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यामध्ये टेम्परेचर तपासणी करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागातही कोरोना पसरत असल्याचे चित्र आहे. खेडोपाडी पसरत असलेल्या कोविड- १९ चा प्रादुर्भाव आपल्या गावात व परीसरात पसरु नये. नागरिकांचे टेम्परेचर जास्त असेल अशा नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक लिहून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वरकुटे (ता. करमाळा) येथे पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सर्व नागरिकही सहकार्य करत आहेत. सर्व युवकांनी स्वखर्चाने ही मशीन आणून उपक्रम राबवीला. यामध्ये उमेश चेंडगे, नागेश तानाजी चेंडगे, प्रीतम मोरे, अक्षय सुतार, मेघराज रोकडे, अमित जागते, नंदकुमार पाटील, कविता शिंदे, समाधान चेंडगे, सोदागर मोरे, दयानंद डौले, करण चेंडगे हे परिश्रम घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolgaon in Solapur district the youth conducted a thermal screening of the villagers