कुर्डुवाडी माढा रस्त्यावरील अपघातात एक ठार

Kurduwadi Madha road accident in one killed
Kurduwadi Madha road accident in one killed

कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी- माढा रस्त्यावरील भोसरे ते वडाचीवाडी दरम्यान १९ वर्षाच्या तरुणाला अनोळखी वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना  रविवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान घडली. माऊली मोहन ढेकळे (वय १९, रा. वडाचिवाडी, ता. माढा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नामदेव रामा लोभे (रा. वडाचीवाडी, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुर्डुवाडीहुन वडाचीवाडी या आपल्या गावी जात असताना भोसरे शिवारात काम सुरु असलेल्या पुलाजवळ माऊली ढेकळे हा जखमी युवक व त्याची दुचाकी (एमएच १३ एएम २६१८) पडलेली दिसली. अज्ञात वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात व हयगयीने गाडी चालवून त्याला जोरात धडक दिली व वाहनासह पळून गेला. माऊलीच्या अंगावरुन गाडी गेल्याने त्याच्या डोक्यास, पोटास  मार लागुन जखमी झाला. यामध्ये दुचाकीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. जखमी माऊलीस कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतू उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे वडाचीवाडी व परिसरात शोककळा पसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com