esakal | कुर्डुवाडी पोलिसांकडून 24 तासाच्या आत जबरी चोरीतील संशयितास अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

Kurduwadi police arrest robbery suspect within 24 hours

सोशल मीडियाच्या माध्यमातून गाडी घ्यायला आलेल्या चौघांना मारहाण करून एक लाख 10 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांपैकी एकाला सुमारे एक लाखांच्या मुद्देमालासह कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत अटक केली. इतर दोघांचा शोध सुरू आहे. शनैश्वर विश्वनाथ काळे (वय 35, रा वडाचीवाडी वस्ती, ता. माढा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

कुर्डुवाडी पोलिसांकडून 24 तासाच्या आत जबरी चोरीतील संशयितास अटक 

sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : सोशल मीडियाच्या माध्यमातून गाडी घ्यायला आलेल्या चौघांना मारहाण करून एक लाख 10 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांपैकी एकाला सुमारे एक लाखांच्या मुद्देमालासह कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत अटक केली. इतर दोघांचा शोध सुरू आहे. शनैश्वर विश्वनाथ काळे (वय 35, रा वडाचीवाडी वस्ती, ता. माढा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 
सोशल मीडियावर दुचाकी 50 हजार रूपयांना विकायची आहे, अशी पोस्ट फिर्यादी देविदास आत्माराम ढमाले (रा. लातूर) यांनी वाचली. फिर्यादीचे मित्र विजय वाघमारे यास गाडी घ्यावयाची असल्याने फेसबुक पोस्टवरील पोस्ट टाकणाऱ्याचा फोन नंबर घेऊन त्याच्याशी संपर्क साधला. फिर्यादी व त्याचे तीन मित्र पोस्ट टाकणाऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी पिंपळखुटे ते वडाचीवाडी रस्त्यावर आले असताना अनोळखी तिघांनी चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील रोख 56 हजार 100 रुपये व 54 हजार 200 रुपये किंमतीचे चार मोबाइल, घड्याळ असा एकूण एक लाख 10 हजार 300 रूपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला होता. 
याबाबत ता. 28 रोजी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. काही तासातच गोपनीय माहितीद्वारे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डोंगरे, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, हेड कॅंन्स्टेबल ललीत शिंदे, दत्ता सोमवाड, दीपक घोरपडे, सागर गवळी, संभाजी शिंदे, सिद्धनाथ वल्टे या पथकाने एकाला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी रोख रक्कम एक लाख 300 रूपयांचा माल हस्तगत केला. 

संपादन : वैभव गाढवे