esakal | संस्थाचालक मामाच्या त्रासाला कंटाळून प्रयोगशाळा सहायक भाच्याची आत्महत्या ! संस्थाचालकासह पाच मुख्याध्यापकांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_logo_913.jpg

फिर्यादीतील बाबींच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी
संस्थाचालक भालचंद्र कस्तुरकर यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली असून त्या-त्यावेळी कार्यरत मुख्याध्यापकही त्यास जबाबदार आहेत, अशी फिर्याद रेखा बोंदार्डे यांनी नुकतीच दिली आहे. त्यानुसार सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. 
- अजय जगताप, पोलिस निरीक्षक, विजापूर नाका पोलिस ठाणे, सोलापूर

संस्थाचालक मामाच्या त्रासाला कंटाळून प्रयोगशाळा सहायक भाच्याची आत्महत्या ! संस्थाचालकासह पाच मुख्याध्यापकांवर गुन्हा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : संस्थाचालक मामा आणि मुख्याध्यापिका मामी यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्याच संस्थेत प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत भाचा गुंडूराव बोंदार्डे यांनी 20 जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्यांची पत्नी रेखा बोंदार्डे यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार संस्थापकासह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीतील बाबींच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी
संस्थाचालक भालचंद्र कस्तुरकर यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली असून त्या-त्यावेळी कार्यरत मुख्याध्यापकही त्यास जबाबदार आहेत, अशी फिर्याद रेखा बोंदार्डे यांनी नुकतीच दिली आहे. त्यानुसार सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. 
- अजय जगताप, पोलिस निरीक्षक, विजापूर नाका पोलिस ठाणे, सोलापूर

विजयपूर रोडवरील नुतन प्रशालेत प्रयोगशाळा सहायक म्हणून बोंदार्डे काम करीत होते. तत्पूर्वी, संस्थेने त्यांना 2001 ते 2003 रोजी सक्‍तीच्या रजेवर पाठविले. कामावर हजर झाल्यानंतर या काळातील वेतन मागूनही संस्थेने ते दिले नाही. तसेच 12 वर्षांनी शासनाकडून मिळणारी वेतनवाढही थांबविली. घरगुती भांडणाचा राग मनात धरून संस्थाचालक भालचंद्र कस्तुरकर, त्यांची पत्नी तथा तत्कालीन मुख्याध्यापिका इंदुमती कस्तुरकर यांनी माझ्या पतीला त्रास दिला, असेही रेखा बोंदार्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या काळातील मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात कचरोलाल दिगंबर चौधरी, रमेश दिगंबर चौधरी, नंदकुमार सावळे, रुपाली शशिकांत चेंडके यांचाही समावेश आहे. रेखा बोंदार्डे यांच्या फिर्यादीनुसार आता पोलिसांनी गुंडूराव बोंदार्डे यांनी शासनाकडे पाठविलेली पत्रे, त्यावर शासनाकडून संस्थेला आलेले उत्तर आणि संस्थेने केलेली कार्यवाही, याची शहानिशा केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.

गुन्ह्यासंदर्भातील ठळक बाबी...

  • आत्महत्या केलेले गुंडूराव बोंदार्डे हे संस्थापक भालचंद्र कस्तुरकर यांच्या संस्थेत 1987 पासून करीत होते काम
  • बोंदार्डे यांना 2001 ते 2003 या कालावधी संस्थेनेच रजेवर पाठवूनही संस्थेने दिले नाही वेतन
  • प्रयोगशाळा सहायक म्हणून काम करताना 12 वर्षांनी वेतनवाढ मिळत असतानाही दिली नाही
  • बोंदार्डे यांच्या सेवापुस्तिकेत केली खाडाखोड; वेतनवाढ आणि रजा कालवधीतील वेतनासाठी सातत्याने केला पाठपुरावा
  • शासनाचे आदेश असतानाही त्याची केली नाही अंमलबजावणी; 2001 पासून संस्थाचालकांनी जाणीवपूर्वक दिला त्रास
  • 20 जानेवारी 2020 रोजी बोंदार्डे यांनी संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
  • पाच मुख्याध्यापकांसह संस्थाचालकाविरुध्द विजापूर नाका पोलिसांत दिली गुंडूराव बोंदार्डे यांच्या पत्नी रेखा बोंदार्डे यांनी फिर्याद
  • आत्महत्या केलेले गुंडूराव बोंदार्डे हे संस्थाचालक भालचंद्र कस्तुरकर यांचे भाचे होते; कस्तुरकर यांच्या भावाच्या मुलीसोबत झाला होता बोंदार्डे यांचा विवाह
  • बोंदार्डे यांची पत्नी शिक्षिका असून त्यांचा मुलगा अभियंता असून मुलगी अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे
  • विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय जगताप हे तपास करीत आहेत