कै.रजनी अंबुरे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत इराणचा शाहीन सादेह विजेता

fide sadin.jpg
fide sadin.jpg

सोलापूर ः येथील कै.रजनी अंबुरे स्मृती प्रित्यर्थ ऑनलाइन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह याने मिळवले. 
श्रेयांस शहा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चेस एक्‍सलन्स व श्रेयांस शहा चेस इन्स्टिट्यूट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रजनी अंबुरे स्मृती स्पर्धा आयोजित केली होती. या ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया , इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशातील ग्रॅंडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. 
इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने 78 गुणांसह विजेतेपद पटकावले. बेलारूसचा ग्रॅंडमास्टर अलेक्‍सी अलेक्‍झांडरोव्ह 68 गुणांसह उपविजेता ठरला. भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर अरण्यक घोष यास 67 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. इराणचा मानांकित खेळाडू नवाझ अली यास 63 गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. सर्बियाचा ग्रॅंडमास्टर दुशन पोपोविच यास 61 गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेत एकूण 868 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. 
या स्पर्धेत विविध गटातील अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे. 
उत्कृष्ट भारतीय:- संकर रेड्डी (गुंटुर) व बीन्साकेत (विशाखा पट्टणम). उत्कृष्ट महाराष्ट्र:- सोहम खासबारदार, कोल्हापूर, सिध्दांत गवई, नागपूर व गुरुप्रसाद कुलकर्णी, मुंबई 
उत्कृष्ट सोलापूर:- गायकवाड, रोहित पटवर्धन व रिध्दी उपासे. 17 वर्षाखालील गट- नवीन कनाईअप्पन (चेन्नई), अभिषेक मिश्रा (वाराणसी), जय शंकर सुब्रमणीयम (वेल्लोर) 
15 वर्षखालील गट - सजीत बारूआ (प.बंगाल), अव्यय शर्मा(पटना) व ओम पाटील (बुलढाणा). 13 वर्षाखालील गट - प्रवीणकुमार जैन (फरीदाबाद, हरियाणा), चिन्मय जैन (फरीदाबाद), हाईरिथ धिंग्रा ( फिरोजपुर, पंजाब). 
येथील मधुकर अंबुरे यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. तांत्रिक पंच म्हणून फिडे व पंच दीपक वायचळ, शार्दूल तपासे, श्रेयस विवेक पुरोहित आणि चंद्रशेखर कोरवी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त अविनाश अंबुरे, अखिल भारतीय महासंघाचे सचिव भरतसिंग चौहान, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयुर, आंतरराष्ट्रीय ग्रॅंड मास्टर व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अभिजीत कुंटे, आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुमुख गायकवाड व ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत गंगाजी यांचे मार्गदर्शन लाभले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com