esakal | सभागृह नेता अन्‌ विरोधी पक्षनेता बदलणार ! 10 नोव्हेंबरनंतर बैठक; अमोल शिंदेंना प्रतीक्षा गाडीची
sakal

बोलून बातमी शोधा

solapur-muncipal_201911323895.jpg

सभागृह नेतापदी शिवानंद पाटील? 
शहरात खूप वर्षांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. त्यानंतर अडीच वर्षांनी महापौर, उपमहापौर बदलले. तीन सभागृह नेते झाले असून आता पुन्हा चौथ्या नगरसेवकाला संधी मिळणार आहे. श्रीनिवास करली यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना आता या पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. त्यांच्याऐवजी आता शिवानंद पाटील यांचा पक्षाकडून विचार सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते कोठे यांनी अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी देऊ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, गाडी मिळेल या आशेवरील अमोल शिंदे अद्यापही गाडीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांना शेवटच्या काही महिन्यांत गाडी मिळणार की, एक वर्ष अगोदर, याची उत्सुकता आहे.

सभागृह नेता अन्‌ विरोधी पक्षनेता बदलणार ! 10 नोव्हेंबरनंतर बैठक; अमोल शिंदेंना प्रतीक्षा गाडीची

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : आमदारकीपूर्वी महेश कोठे यांची पाठराखण करीत कॉंग्रेसला "हात' दाखवत हाती धनुष्यबाण घेतलेल्या अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी मिळवून देणारच, अशी ग्वाही कोठे यांनी काही वर्षांपूर्वी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. मात्र, आता महापालिकेची निवडणूक होऊन साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला. तरीही अमोल शिंदे यांना गाडी मिळू शकली नाही. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचा सभागृह नेता बदलला जाणार असून त्यासाठी 10 नोव्हेंबरनंतर बैठक आयोजित केली जाणार आहे.

सभागृह नेतापदी शिवानंद पाटील? 
शहरात खूप वर्षांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. त्यानंतर अडीच वर्षांनी महापौर, उपमहापौर बदलले. तीन सभागृह नेते झाले असून आता पुन्हा चौथ्या नगरसेवकाला संधी मिळणार आहे. श्रीनिवास करली यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना आता या पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. त्यांच्याऐवजी आता शिवानंद पाटील यांचा पक्षाकडून विचार सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते कोठे यांनी अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी देऊ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, गाडी मिळेल या आशेवरील अमोल शिंदे अद्यापही गाडीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांना शेवटच्या काही महिन्यांत गाडी मिळणार की, एक वर्ष अगोदर, याची उत्सुकता आहे.


विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून शिवबंधन बाजूला ठेवून कोठेंनी शिवसेनेच्या उमेदवारालाच शह दिला. त्यावेळी शिवसेनेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त करीत पक्षाविरुध्द बंड करणाऱ्या महेश कोठेंविरुध्द त्यांनी काम केले. त्यात काहींनी माजी आमदार दिली माने यांचे तर, काहींनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मदत केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नॉटरिचेबल संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेनेकडून दिलीप माने यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत माने व कोठे यांचा पराभव करीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला. पक्षाकडून बंडखोर कोठेंवर कारवाई होईल, अशी चर्चा होती. काही पदाधिकाऱ्यांनी तशी मागणीही केली, मात्र कोठेंची ताकद पाहून पक्षाकडून त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतरही महापालिकेत शिवसेनेकडून महेश कोठे विरोधी पक्षनेतेपदी कायम राहिले. दरम्यान, पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते कोठे यांनी अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी देऊ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, गाडी मिळेल या आशेवरील अमोल शिंदे अद्यापही गाडीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांना शेवटच्या काही महिन्यांत गाडी मिळणार की, एक वर्ष अगोदर, याची उत्सुकता आहे.


जिल्हाप्रमुखांनी कोठेंना दिले अधिकार
शिवसेनेचे सोलापूर शहरात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. शहरात पक्षवाढीसाठी या दोघांच्या विचारानुसार कोठे प्रयत्न करतील, अशी अपेक्षा पक्षातील नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना आहे. तत्पूर्वी, महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून बरडे, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड यांच्यापैकी एकास संधी मिळेल, अशी अपेक्षा असताना तसे काहीच झाले नाही. राज्यातील सत्तेची समिकरणे बदलल्यानंतर कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसह अन्य विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला सत्तेतून पाय उतार होण्याचा मार्ग निश्‍चित झाला. मात्र, त्यानुसार काहीच झाले नाही आणि पुन्हा महापालिकेत भाजपचीच सत्ता कायम राहिली. त्यानंतर दोन्ही जिल्हाप्रमुखांसह शहरप्रमुखांनी महापालिकेबाबत सर्वाधिकार कोठेंना देऊन टाकल्याचे स्पष्ट केले. त्यामागे शहर व महापालिकेतील कोठेंची ताकद हेच कारण असल्याची चर्चा आहे.


दोन्ही आमदारांनी स्वार्थ पाहिला
महापालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांना पद्मशाली समाजाचा चेहरा म्हणून पक्षाकडून संधी मिळाली. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी शहरातील माझा समाज भाजपच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांना मदत केली. दरम्यान, माझी सभागृह नेता म्हणून निवड झाल्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणूक, त्या निवडणुकीची आचारसंहिता, आता कोरोना आणि पदवीधर व शिक्षक आमदारकीची आचारसंहिता लागली. या काळात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुदतवाढीची मागणी करुनही पक्षाकडून त्यावर सकारात्मक निर्णय घेतलेला दिसत नाही. आता कोणतीही निवडणूक नसल्याने मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत साशंकता वाटते, असे करली यांनी सांगितले.