महत्त्वाची माहिती : बालकांसाठी ‘हे’ विशेष हक्क का आहेत; जाणून घ्या कारण

Learn about right to children from book Maharashtra State Women and Child Development
Learn about right to children from book Maharashtra State Women and Child Development

सोलापूर : जगातील लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के लोकसंख्या बालकांची आहे. शरीराने आणि मनाने अपरिपक्व असणाऱ्या या बालकांनाही हक्क मिळाला हवे याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. सयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये याबाबत पुढाकर घेतला आणि जगापुढे बालहक्कांचा करार मांडला.
बालकांचे विशेष हक्का :
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क करारात एकूण ५४ कलमे आहेत. या कलमांचे चार प्रकारात वर्गीकरण केले आहे. अ) अस्तित्वाचा हक्क ब) संरक्षणाचा हक्क क) विकासाचा हक्क ड) सहभागाचा हक्क
- अस्तित्वाचा हक्क : यामध्ये बालकांना योग्य आहार, निवारा, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, आरोग्यसेवा व लसीकरण, सुदृढ आरोग्य नाव आणि राष्ट्रीयत्व मुलींना जगण्याचा हक्क असतो, स्वत:चे भविष्य व व्यवसायाबाबत निर्णय घेणे.
- संरक्षणाचा हक्क : यामध्ये वाईट वागणूक न मिळणे, दुर्लक्ष, मारहाण, शोषणापासून संरक्षण, नैसर्गिक प्रकोप, युद्ध व संकटकाळी विशेष संरक्षण.
- विकासाचा हक्क : शिक्षण, कला, कल्पनेचा हक्क विकास, मानसिक आधार, विकासासाठी सुरक्षित परिसर, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि सल्ला, खेळण्याची संधी, मुलींना घरकामाऐवजी खेळण्याची संधी.
- सहभागाचा हक्क : सामाजिक भेदभावापासून संरक्षण, धार्मिक भेदभावापासून संरक्षण, प्रश्‍न विचारण्याचे स्वातंत्र्य, आर्थिक भेदभावापासून संरक्षण, लैंगिक भेदवापासून संरक्षण, स्वतंत्र विचाराचा विकास.


बालहक्क करारातील कलमांचा सारांश

  1. बालकाला वंश, लिंग, धर्म, भाषा, पालकाची राजकीय मते इ. कोणताही भेदभाव न कोणताही भेदभाव न करता हक्क मिळावे.
  2. खाजगी अगर सरकारी संस्था, कोर्ट अगर शासकीय अधिकारी वगैरे सर्वांनी मुलांबद्दल काही निर्णय घेताना मुलाचे हित हाच अग्रेसर विचार ठेवावा.
  3. प्रत्येक बालकास विशेषत: मुलींना जगण्याचा मुलभू हक्क आहे.
  4. मुल जन्मल्याबरोबर त्यांची नोंद करावी आणि त्यात नाव, गाव, राष्ट्रीयता नमूद करावे.
  5. बालकांना शिक्षणाचा हक्क, वाचण्याच्या आनंदापासून त्यांना वयचित ठेवू नये.
  6. जास्तीत जास्त निरोगी आयुष्य जगण्याचा आणि आजारीपणात वैद्यकीय मदत मिळण्याचा मुलालचा हक्क.
  7. आपले स्वत्व, राष्ट्रीयता, नाव, कौटुंबिक नाती हे सर्व कायम ठेवण्याचा मुलाचा हक्क.
  8. ज्या मुलाला आपली स्वत:ची मते बनविण्याची कुवत अलेली आहे त्याला त्यांच्या हितासंबंधीच्या सर्व गोष्टींबद्दल मत देण्याचा हक्क.
  9. बालक कुटूंबात राहणे महत्त्वाचे : मुलाच्या सर्वाधिक हिताचा विचार करता जोपर्यंत अशक्यप्राप्त होत नाही तोपर्यंत मुलाला आपल्या आई- वडिलांजवळ राहण्याचा हक्क आहे. एका किंवा दोन्ही पालकांसापून वेगळे झाल्यावरही त्या दोघांशी संपर्क ठेवण्याचा मुलाचा हक्क आहे.
  10. मुलाला आपले विचार प्रकट करण्याचा हक्क. मुलाच्या विचारस्वातंत्र्याचा, सद्‌सद्‌विवेकबुद्धी वापरण्याचा व कोठलाही धर्म मानण्याचा हक्क, शिक्षकांना व पालकांना नेहमी प्रश्‍न विचारण्याचा हक्क.
  11. पालन पोषण, विकासाचा हक्क.
  12. शारीरिक व मानसिक अत्याचारापासून संरक्षणाचा हक्क
  13. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौध्दिक वाढीला पोषक अशा जीवनमानात वाढण्याचा बालकांचा हक्क.
  14. प्रत्येक बालकाला विश्रांती, खेळ, करमणूक, सांस्कृतिक जीवन, कला यात भाग घेण्याचा हक्क. (संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, रंगभरणे)
  15. आर्थिक शोषणापासून आणि कोणत्याही धोकादायक शिक्षणाच्या शारीरिक व मानसिक प्रगतिच्या आड येणाऱ्या कामापासून संरक्षण मिळवण्याचा हक्क.
  16. लैंगिक शोषणापासून अगर लैंगिक गैरप्रकार पासून बालकांचे संरक्षणाचा हक्क. (स्रोत : बाल न्याय अधिनियम व बालकांचे हक्क : महिला व बालविकास आयुक्तालय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com