वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर अन्‌ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

 Lecture for Doctor and Student
Lecture for Doctor and Student
Updated on

सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय संशोधन पथकातर्फे 8 व 9 फेब्रुवारीला वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला देश-विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून या परिषदेचे उद्‌घाटन हॉटेल बालाजी सरोवर येथे शनिवारी (ता. 8) दुपारी चार वाजता होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


लहान मुलांमधील लठ्ठपणा, अत्याधुनिक खुब्याचे सांधेरोपण, अनुवंशिक लठ्ठपणाचे गुणसूत्रीय निदान, लठ्ठपणाचे मज्जासंस्थेवरील परिणाम, चिरतारुण्याचे रहस्य, कोपऱ्याचे सांधेरोपण, क्ष-किरण उपचाराचे दुष्परिणाम, लठ्ठपणाच्या उपचारात शस्त्रक्रियेचे महत्त्व, मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन आदी प्रमुख विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

डॉ. ठाकूर हे या परिषदेचे अध्यक्ष असून डॉ. जी. ए. पंडित हे सचिव आहेत. कार्यकारी सचिव म्हणून डॉ. सुनील हंद्राळमठ यांची निवड करण्यात आली आहे. "लठ्ठपणाचे दुष्परिणाम' हे या परिषदेचे घोषवाक्‍य असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी या वेळी सांगितले. लठ्ठपणाच्या जनजागृतीसाठी 9 फेब्रवारीला सकाळी सहा वाजता वैद्यकीय महाविद्यालयापासून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. संतोष हराळकर, डॉ. औदुंबर मस्के हे या वॉकेथॉनचे आयोजक आहेत. 

यांचे होणार मार्गदर्शन 
डॉ. प्रीती वारद, डॉ. अविनाश अभ्यंकर (अमेरिका), डॉ. हितेंद्र महाजन (नाशिक), डॉ. पाटणकर (पुणे), डॉ. श्रद्धा दिड्डी, ऋषी देवव्रतजी (बेंगलोर), डॉ. संजीव ठाकूर (अधिष्ठाता), डॉ. सुनील हंद्राळमठ, डॉ. स्मिता चाकोते, डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. गुरुनाथ वच्छे हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com