लाच भोवली ; `या `महापालिकेतील अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सोलापूर : सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या महापालिकेतील विधान सल्लागार अरूण सोनटक्के यांना आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी निलंबित केले. या कालावधीत मुख्यालय सोडू नये असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

सोलापूर : सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या महापालिकेतील विधान सल्लागार अरूण सोनटक्के यांना आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी निलंबित केले. या कालावधीत मुख्यालय सोडू नये असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा - या महापालिकेचे ब्रीद झाले धनसेवा हीच ईशसेवा

आयुक्तांनी काढले आदेश 
हद्दवाढ भागातील आईच्या जागेचा कर भरण्यासाठी त्या जागेवर नाव लावावे, यासाठी अर्जदाराने महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने तो अर्ज विधान सल्लागारांकडे पाठविला. तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी विधान सल्लागार अरुण नागनाथ सोनटक्‍के याने 50 हजारांची लाच मागितली. त्यांना 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आवारात लाचेची रक्‍कम देण्याचे ठरले. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून सोनटक्‍के यास रंगेहाथ पकडले होते. अधिनियमातील तरतुदीनुसार लाचलुचपत विभागाकडून अभिप्राय आल्यावर सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले. 

हेही वाचा - आगीचा भडका उडाला, आणि....

घटनेची पार्श्‍वभूमी 
सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ परिसरातील एका जागेच्या संदर्भात महानगरपालिका उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी मनपा उपायुक्तांनी अभिप्राय घेण्यासाठी महापालिकेचे विधान सल्लागार सोनटक्के यांच्याकडे हे प्रकरण पाठविले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये अभिप्राय तक्रारदाराच्या बाजूने करून देण्यासाठी विधान सल्लागार सोनटक्के याने लाच मागितली होती. त्यावर तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या आवारात सोनटक्के याने लाचेची रक्‍कम स्वीकारली.

पाठलाग करुन पकडले रंगेहात
लाचलुचपतचा सापळा असल्याचे समजताच सोनटक्के तेथून बेगमपेठच्या दिशेने पळाला. पोलिसांनी त्याला किडवाई चौक ते बेगमपेठ पोलिस चौकी दरम्यान पाठलाग करून पकडले. तक्रारदाराकडून लाचेची 50 हजारांची रक्‍कम विधान सल्लागार सोनटक्‍के याने स्वीकारली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचल्याचा अंदाज आल्यावर सोनटक्‍के याने तिथून पळून काढला. किडवाई चौक ते बेगमपेठ पोलिस चौकीपर्यंत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. त्यावेळी त्याच्या दुचाकीतच पैसे आढळून आले, याचे अधिकाऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: legal advisor of solapur corporation suspend