
या मतदार प्रक्रियेत पक्ष आणि त्यांच निवडणूक चिन्ह याचा कोठे ही उल्लेख आढळत नाही. म्हणजेच राजकारण विरहित प्रतिनिधी असावेत, असा संकेत आहे. पण आज मात्र हा ज्येष्ठांचे सभागृह, राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केंद्र झाले आहे. संविधानाला अभिप्रेत असा प्रतिनिधी म्हणून डॉ श्रीमंत कोकाटे हेच एकमेव उमेदवार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सोलापूर : देशातील सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. विधानसभेतून विद्वत्ताना प्रतिनिधित्व मिळेलच असे नाही. राज्याच्या विविध क्षेत्रातील जाणकारांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा, त्यांच्या व्यासंगाचा राज्यकारभारात उपयोग व्हावा, यासाठी विधानपरिषदेची निर्मिती झाली आहे. ते पुनर्वसन केंद्र नसून विद्धतांची सभा आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या प्रचारार्थ डॉ. निर्मलकुमार फडकूले सभागृहात पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
या मतदार प्रक्रियेत पक्ष आणि त्यांच निवडणूक चिन्ह याचा कोठे ही उल्लेख आढळत नाही. म्हणजेच राजकारण विरहित प्रतिनिधी असावेत, असा संकेत आहे. पण आज मात्र हा ज्येष्ठांचे सभागृह, राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केंद्र झाले आहे. संविधानाला अभिप्रेत असा प्रतिनिधी म्हणून डॉ श्रीमंत कोकाटे हेच एकमेव उमेदवार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उमेदवार डॉ श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भाषणात बेरोजगार पदवीधरांपासून ते डॉक्टर, विधिज्ञ, व्यवसायिक, नोकरदार, शेतकरी, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील पदवीधरांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. ज्येष्ठांचा सभागृहाच महत्त्व वाढवून त्याची प्रतिष्ठा वाढवण्याच काम करणार आहे. आपल्या पुढच्या पिढीच भविष्य बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी आहे, असं मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक गणेश माने देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील, डॉ. रावसाहेब पाटील, डी. एन. गायकवाड, इरफान सय्यद, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचे संयोजन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केले होते.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व जुनी पेन्शन हक्क समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे लखन थिटे, सीताराम बाबर, अरविंद शेळके, नागेश पवार, संजय भोसले, सुलेमान पिरजादे, पिंटू पांढरे, विनोद आगलावे, हनुमंत पवार, दत्ता पवार, धर्मा भोसले, बसवराज आळगे, अजित शेटे, सत्यम सूर्यवंशी, जुनी पेन्शन संघटनेचे आशिष चव्हाण, राम शिंदे, प्रमोद कुपेकर, पद्मसिंह व्हरडे, सरदार नदाफ, श्री. लंबे सर आदींसह अनेक पदवीधर मतदार यावेळी उपस्थित होते.
संपादन : अरविंद मोटे