सोलापूर जिल्ह्यात वाढतोय बिबट्याचा वावर : बिबट्या की तरस या घोळात मार्चपासूनच्या हल्ल्यांकडे झाले दुर्लक्ष 

bibtya_30.jpg
bibtya_30.jpg
Updated on

सोलापूर : चार जिल्ह्यांचा प्रवास करत करमाळ्यात आलेल्या बिबट्याने पाच सात व नऊ डिसेंबर रोजी करमाळा तालुुक्‍यात तिघांचे बळी घेतले. हा बिबट्या अद्याप जरेबंद झालेला नाही. हा नरभक्षक बिबट्या पकडकला जाईल अथवा मारला जाईल मात्र, या बिबट्याची जागा दुसरा बिबट्या घेणारच आहे. यापूर्वी अनेकदा जिल्ह्यातील बिबट्याच्या वावराकडे बिबट्या की बिबट्या सदृश्‍य प्राणी या घोळात प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून पाटकूल, पेनूर, पंढरपूर, सावळेश्‍वर या ठिकाणी झालेले हल्ले बिबट्याने केले की बिबट्या सदृश्‍य प्राणी तरस नावाच्या प्राण्याने केले अजूनही स्पष्ट झालेच नाही. मात्र, जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढतो आहे, हे या सर्व घटनांवरून दिसून येते आहे. 

मागील दहा दिवसात करमाळा तालुक्‍यातील फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण या ठिकाणी तिघांचे बळी घेतले आहेत. याशिवाय दोन ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न केले आहेत. एवढी मोठी घटना घडल्यानंतरच वन खाते व प्रशासन खडबडून जागे झाले मात्र यापूर्वी सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांकडे मात्र वन खात्यांने व प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले होते. लॉकडाउन कालावधीत मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा ठिकठिाणी झालेल्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले होते. मात्र, तो बिबट्या नसून बिबट्या सदृश्‍य प्राणी असलेला तरस आहे, असे सांगत या घटनांकडे दुर्लक्ष केले होते. अनेकदा हल्ले होऊनही त्यावेळी एकदाही तरस किंवा बिबट्या या पैकी काहीच जेरबंद झाले नव्हते किंवा त्या प्राण्यांची ओखळही पटवली गेली नव्हती. 

उसाचे पिक एक जंगलच 
मागील काही वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पिक पद्धती पूर्णपणे बदली असून पूर्वीप्रमाणे ज्वारी- तूर, गहु-हरभरा या पिकांऐवजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस व केळीची पिके घेतली जातात. उजनीच्या पाण्याची सोय झाल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फळबागा वाढल्या आहेत. यामुळे बिबट्या साराख्या प्राण्यांना लपण्यासाठी मोठ्या प्रमणात जागा तयार झाली आहे. करमाळा, माढा, पंढरपूर तालुक्‍यातसह मोहोळ, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्‍यातील सीना नदी काठी उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणच्या ऊस शेतीमुळे दुसरे जंगलच तयार झाले आहे. 

याबद्दल सोलापूर वन विभागाच्या कार्यालयीन अधिक्षक संध्याराणी बंडगर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, यापूर्वी आपल्या जिल्ह्यात अनेकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. मात्र, मार्च-एप्रिल दरम्यानचे हल्ले करणारा प्राणा हा बिबट्या नव्हताच तो तरस असावा. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com