esakal | व्यवसायाच्या मदतीने शिकले स्वावलंबनाचे धडे

बोलून बातमी शोधा

vijaya bavdhankar.jpg}

हनुमान नगरातील विजया बावधनकर त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वीकारलेला मागील तीस वर्षांतील त्यांच्या आयुष्याचा प्रवास मांडला. 

व्यवसायाच्या मदतीने शिकले स्वावलंबनाचे धडे
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर :  संसाराला लागणारा पैसा उभा करायचा असेल, तर काही तरी करायलाच हवे असा विचार करून घराबाहेर पडले. मैत्रिणीसमवेत फरसाण व खायचे पदार्थ विकत घेत सुरूवात केली. बघता बघता व्यवसायाच्या माध्यमातून मुले स्वतःच्या पायावर उभी करत अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करता आले. हे शब्द आहेत हनुमान नगरातील विजया बावधनकर यांचे. 
हनुमान नगरातील विजया बावधनकर त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वीकारलेला मागील तीस वर्षांतील त्यांच्या आयुष्याचा प्रवास मांडला. 
सुरुवातीला लहान मुलगा पाचवीला गेला, तेव्हा संसारात पैशाची कमतरता पडेल याचा अंदाज आला. पतीला मदत करावी लागणार तर सुरुवातीला कंपनीत काम धरले. पण कंपनीतील कामाला अतिशय कमी वेतन होते. त्यातून काही भागण्यासारखे नव्हते. शेळगी येथील एक मैत्रीणीशी बोलून काही व्यवसाय सुरु करू, असे विचारले. मैत्रिणीसोबत शहरातील काही फरसाण तयार करणाऱ्या निर्मात्याकडून काही खाद्य पदार्थ मिळवले. अगदी एक रुपया एक पाकीट विकण्यामागे मिळत होते. सुरवातीला काही पैसे टाकून खरेदी केली व शहरातील शाळा, सरकारी कार्यालये आदी भागात हे खाद्य पदार्थ विकू लागलो. त्यावेळी फरसाणची किमंत अगदी 25 रुपये किलो एवढी कमी होती. त्याच दुकानात इतरही मिठाईची पाकिटे मिळायची. 
घरातील कामे करून घरातून बाहेर पडून साहित्य विक्री होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कामापेक्षा या व्यवसायात चार पैसे अधिक मिळू लागले. आपल्या वेळेनुसार काम करता येत होते व पुरेसी कमाई झाली की घरी येऊन घरची कामे करणे शक्‍य होते. बहुतेकवेळा बॅंका व कार्यालयामध्ये अनेकजण कामाच्या निमित्ताने भुकेलेले लोक येत असत. त्यांनाही कमी दरातील खाद्य पाकिटे परवडणारी होती. 
अनेक वर्ष सातत्याने हे काम केल्याने विक्रीदेखील भरपूर होत असे. अगदी सुरुवातीच्या काही दिवसात तीनशे ते चारशे रुपये मिळत असत. नियमित खरेदी करणारे ग्राहकांची मदत होती. या कमाईतून संसाराचे अनेक छोटे-खर्च भागत गेले. मुले शिकून त्यांच्या व्यवसायाला लागली. आजारपणाचा खर्च या कमाईतून निघाला. आता या व्यवसायाकडे पाहताना खूप समाधान होते. 

जगण्याची शिकवण 
संसाराचा गाडा बऱ्यापैकी चालवता आला. आता पती रिटायर्ड झाले तरी मी मात्र अजूनही काम करते. मधुमेहाचा त्रास असला तरी व्यवसायाच्या निमित्ताने फिरले तर निदान दुखणे विसरते. तीस वर्षाच्या या व्यवसायाने मला जगण्याचे नवे अर्थ शिकवले व स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.