तर तुमचं लायसन जप्त होऊ शकते

License confiscated if the vehicle was speeding
License confiscated if the vehicle was speeding

सोलापूर : सर्व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम माहित असतीलच असं नाही. कळत नकळत अनेकदा वाहतुकीचा नियम मोडतोच. पण वाहतुक नियम मोडू नयेत म्हणून या वाहतुकीचे नियम वाहनधारकांना माहिती व्हावेत म्हणून वाहतूक नियंत्रकांकडून वारंवार सूचना आणि माहिती दिली जाते. तरीही नियम मोडले जातात आणि मग दंडात्मक कारवाई होते. ही कारवाई टाळण्यासाठी आणि वाहतुक नियमाचे पालन व्हावे म्हणून प्रत्येकाने काही दक्षता घेईला हवी. सोलापूर- पुणे महामार्गावर जाताना तुमच्या गाडीचा वेग किती हे तपासले जाते. यातून काही गाड्यांवर कारवाईही केली जाते. जडवाहतुक करणाऱ्या वाहनांची नेहमी यात तपासणी होते.
काही वेळा दंड म्हणून रक्कम भरावी लागते पण काही नियम असे आहेत जे मोडल्यास तुमचं लायसन जप्त केलं जाऊ शकतं. आपल्याला याची माहिती नसते आणि जेव्हा कारवाई होते तेव्हा पश्चाताप करत बसावा लागतो.
अनेक रस्त्यावर ठिकठिकाणी वेगाची मर्यादा दर्शवणारे बोर्ड दिसतात. एक्स्प्रेस वेवर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवलीत तर तुम्हाला टोलनाक्यावर अडवलं जातं. त्याठिकाणी दंड तर होतोच पण लायसनसुद्धा जप्त केलं जातं.
रस्त्यावर गर्दी असेल किंवा सिग्नल पडला असेल तर लोकांना बाजूने, फुटपाथवरून गाडी चालवण्याची सवय आहे. इतकंच काय तर लहान उंचीच्या डिव्हायडरवरून गाडी दुसऱ्या बाजुला नेतात. अशी चूक करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. ओव्हरटेक करण्यासाठी अनेकदा वेगानं गाडी चालवली जाते. अशावेळी तुम्ही 40 किमी वेग मर्यादा असलेल्या रस्त्यावरून जात असाल तर अडचण नाही. पण हायस्पीडच्या रोडवरून जाताना ओव्हरटेक करणं अडचणीत आणणारं ठरू शकतं. ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने गेल्यास लायसन जप्त केलं जाईल. रस्त्याने गाडी चालवताना पाठिमागून अँब्युलन्स येत असेल तर तिला वाट दिली जाते. मात्र तुमच्याकडून गाडीला पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला कीवा वाट अडवलीत तर तुमचं लायसन जप्त होऊ शकते. तसेच 5 ते 10 हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो. रहदारीच्या रस्त्यावर रेसिंग करणं किंवा स्टंटबाजी करणं नियमात बसत नाही. यामुळेसुद्धा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. रेसिंगसाठी रेसिंग ट्रॅकवर जाणं योग्य ठरेल. जर हा नियम तोडलात तरीही लायसन तीन महिने पोलिसांच्या ताब्यात गेलंच म्हणून समजा. हॉर्न वाजवू नयेत म्हणून सध्या पोलिसांनी जनजागृती सुरु केली आहे. त्यातही अनेकदा गाड्यांचे नेहमीचे हॉर्न काढून वेगवेगळ्या आवाजातले हॉर्न बसवले जातात. त्यामुळे हॉर्नच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळं ट्राफिक पोलिस तुमचं लायसन जप्त करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com