सोलापूरच्या ग्रामीण भागाला मिळाला कोरोनापासून थोडासा दिलासा 

सोलापूरच्या ग्रामीण भागाला मिळाला कोरोनापासून थोडासा दिलासा 
Updated on

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची संख्या निम्याने घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज केवळ 154 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या सहा एवढी आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या दहा हजार 402 इतकी झाली आहेत. तर मृत्यूंची संख्या 299 एवढी झाली आहे. 

करमाळ्यातील सुतार गल्ली येथील 65 वर्षांचे पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील ब्रह्मपुरी येथील 70 वर्षाचे पुरुष, संत दामाजी शुगर फॅक्‍टरी येथील 59 वर्षाचे पुरुष, पंढरपुरातील डोंबे गल्ली येथील 60 वर्षाची महिला, तांबेकर गल्लीतील 59 वर्षांचे पुरुष तर कवठे (ता. उत्तर सोलापूर) येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या तीनशेच्या उंबरठ्यावर पोचली आहे. 

या गावात सापडले नव्याने कोरोनाबाधित 
अक्कलकोट तालुक्‍यातील कंटेहळ्ळी, समर्थ नगर, सांगवी, बार्शीतील भीम नगर, चारे, कासार गल्ली, मंगळवार पेठ, रोडगा रस्ता, वैराग, करमाळ्यातील हिरडे प्लॉट, हिसरे, जेऊर, जिंती, महेंद्र नगर, मेन रोड, मारवाड गल्ली, एमआयडीसी, शाहूनगर, सुतार गल्ली, वंजारवाडी, वीट, झरे, माढ्यातील कुर्डूवाडी, तांबवे, आंगणगाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, फोंडशिरस खंडाळी, माळीनगर, पिरळे, पिलीव, पुरंदावडे, संग्राम नगर, शेवगाव, वाघोली, यशवंनगर, मंगळवेढ्यातील मुजावर गल्ली, मुरडे गल्ली, नहावी गल्ली, मोहोळ तालुक्‍यातील बेगमपूर, दत्तनगर, एकुरके, गणेश नगर, नरखेड, पाटकुल, साठेनगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तळे हिप्परगा, पंढरपुरातील आंबेडकर नगर, आंबेचिंचोली, अनवली, भंडीशेगाव, डाक बंगला, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, इसबावी, करकंब, केसकरवाडी, मुंडेवाडी, नारायण चिंचोली, ओमकार नगर, रांजझी रोड, तारापूर, तुंगत, वाडीकुरोली, येळे वस्ती, सांगोल्यातील भिमनगर, गायगव्हाण, कडलास, खरातवाडी, कोष्टी गल्ली, महूद, मुन्सिपल क्वार्टर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी, मंद्रूप, एनटीपीसी, उळे येथे आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर रुग्णालयात दोन हजार 837 जण उपचार घेत आहेत. सात हजार 266 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com