सोलापूरच्या ग्रामीण भागाला थोडासा दिलासा; कोरोनाबाधितांची संख्या आज 475 

संतोष सिरसट 
Tuesday, 15 September 2020

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 802 (52), बार्शी- 3530 (128), करमाळा- 1294 (30), माढा- 1801 (55), माळशिरस- 2521 (53), मंगळवेढा- 854 (16), मोहोळ- 812 (34), उत्तर सोलापूर- 623 (25), पंढरपूर- 3794 (86), सांगोला- 1145 (14), दक्षिण सोलापूर- 1154 (24), एकूण 18 हजार 333 (517). 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मागील चार-पाच दिवसांच्या तुलनेत आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 475 एवढी झाली आहे. मागील चार-पाच दिवसामध्ये हा आकडा साधारणपणे 600 च्या वरती होता. आज एकूण तीन हजार 451 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 976 जणांचे अहवाल निगेटिव्ह 475 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मयताच्या बाबतीत मात्र स्थिती चिंताजनक असल्याचे आजही स्पष्ट झाले आहे. आज पुन्हा 13 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या आता 18 हजार 333 इतकी झाली आहे तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 517 एवढी झाली आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही सहा हजार 212 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 11 हजार 604 जण आपल्या घरी सुखरूप पोचले आहेत. आज दामाजी रोड मंगळवेढा येथील 77 वर्षाचे पुरुष, बायपास जवळ करमाळ्यातील 65 वर्षाचे पुरुष, समतानगर अक्कलकोट येथील 73 वर्षाची महिला, बावी (ता. बार्शी) येथील 74 वर्षाचे पुरुष, मुक्ताबाई मठ पंढरपूर येथील 80 वर्षाचे पुरुष, मुंगळी मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील 40 वर्षाचे पुरुष, सांगोला येथील 52 वर्षाची महिला, अकलूज (ता. माळशिरस) येथील 51 वर्षाचे पुरुष, गुरसाळे (ता. करमाळा) येथील 55 वर्षाचे पुरुष, सुळे नगर मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 48 वर्षाची महिला, नाळे प्लॉट बार्शी येथील 65 वर्षांचे पुरुष, तुकाराम नगर कुर्डूवाडी येथील 57 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A little relief to the rural part of Solapur; The number of corona sufferers today is 475