esakal | लॉकडाऊन : दारूमुळे 472 जणांना बेड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

wine

येथे करा तक्रार 
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष दिवसातील 24 तास व आठवड्यातील सातही दिवस सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्या चे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. तक्रारीसाठी 18008333333 टोल फ्री क्रमांक व 8422001133 हा व्हाट्‌सअँप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या शिवाय commstateexcise@gmail.com या ई-मेलवर देखील तक्रार करता येणार आहे. 

लॉकडाऊन : दारूमुळे 472 जणांना बेड्या 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूंचा संसर्ग देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत अवैध मध्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे. महाराष्ट्रात 3 एप्रिलपर्यंत 1 हजार 221 गुन्हे दाखल झाले आहेत तर 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
हेही वाचा - सकाळ ब्रेकिंग! दहावीच्या भूगोल पेपरचा वाढला पेच? 
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग 24 तास कार्यरत आहे. त्यानुसार नाकाबंदी केली असून गोवा, दादरा - नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी - कर्मचारी तपासणी करीत आहेत. राज्यात 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत. 


 

go to top