
सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडत आहेत. दळणवळण बंद असल्याने वस्तूंचा तुटवडा असल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. यामुळे गरिबांना जगणे मुश्किलीचे होत असताना, आता मरणानंतरही महागाई पिच्छा सोडत नाही. कारण, अंत्यसंस्काराच्या साहित्यातही जवळपास 25 ते 30 टक्के दरवाढ झाल्याने गरिबाघरच्या एखाद्या सदस्याचे अंत्यसंस्कारही आता महागाईच्या फेऱ्यात अडकले आहे.
हेही वाचा - फोन एसएमएस ऑनलाइनद्वारे कळणार निकाल
महागाईने होरपळतेय जनता
लॉकडाउनमुळे अत्यावश्यक धान्य, भाजीपालाच्या दरात भरमसाठ वाढ झालेली आहे. किराणा व भुसार अडत व्यापारी संघाचे पदाधिकारी जरी अत्यावश्यक साहित्याचा मुबलक साठा असून, कुठल्याही वस्तूमध्ये दरवाढ झाली नाही, असे म्हणत असले, तरी किराणा व भुसार दुकानदारांकडे या वस्तू भरमसाठ दराने विकल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आधीच लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या गरीब कामगारांना पगाराविना महागाईचे चटके सहन करत अर्धपोटी किंवा उपाशीपोटी दिवस ढकलावे लागत आहेत. त्यातच एखाद्या गरिबाघरच्या सदस्याचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्यातही भरमसाठ वाढ झाल्याने घरातील जिवंत सदस्यांना महागाई होरपळून मारत असल्याचे चित्र आहे. अंत्यसंस्कार ज्या-त्या जातिधर्माप्रमाणे विधीनुसार करावे लागतात. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या तिरडी ते गोवऱ्या व लाकूडफाटापर्यंत अनेक साहित्याच्या दरात वाढ झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व त्याचे दर (कंसात जुने दर)
* डालडा : 75 (किलो) (62) * तेल : 84 (लिटर) (65) * चुरमुरे : 55 (किलो) (35) * हळद : 82 (किलो) (65) * सुतळी : 60 (अर्धा किलो) (50) * खोबरे : 170 (किलो) (140) * कापूर : 110 (150 ग्रॅम) (80) * शेंगा : 30 (250 ग्रॅम) (23) * फुटाणे : 25 (250 ग्रॅम) (10) * साडी : 120 (130) * कापड : 20 (एक मीटर) (25) * मडके : 40 (25) * कापूस : 60 (अर्धा किलो) (45) * लाकूड : 300 (एक मण) (275) * गोवऱ्या : 200 (शेकडा) (170) * बांबू : 90 (75)
ना नफा-ना तोटा तत्त्वावर करतोय पुरवठा
सध्या अंत्यविधीच्या सर्व साहित्यांच्या दरात 25 ते 30 टक्के वाढ झालेली आहे. मात्र लॉकडाउनमुळे गरिबांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यात घरातील सदस्याच्या निधनामुळे त्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलेले असते. त्यातच अंत्यसंस्कार महाग झाल्याचा फटका त्यांना बसू नये यासाठी ना नफा-ना तोटा तत्त्वावर जुन्या दरानेच साहित्य उपलब्ध करून देत आहे. पाच वर्षांच्या आतील बालकांच्या अंत्यसंस्काराचे साहित्य मोफत देतो.
- वेणुगोपाळ कोडम,
अंत्यविधी साहित्य विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.