लॉकडाऊनमध्येही येथे सुरू होता बैलगाड्यांच्या शर्यतीचा सराव

 The lockdown has started here Bullock cart rain race
The lockdown has started here Bullock cart rain race

सांगोला : सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिबंध असतानाही तसेच सध्या लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात उदनवाडी (ता. सांगोला) येथे चक्क बैलगाड्यांच्या शर्यतीचा सराव केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी विजय आलदर (रा. झापाचीवाडी) धनाजी सरगर, (रा. काळामळा, उदनवाडी) नवनाथ वलेकर, साईनाथ सरगर, बापूराव सरगर (रा. सर्व उदनवाडी), भीमराव लवटे (रा. बुद्धेहाळ) या सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने बैल, घोडा गाडी यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यास प्रतिबंध केला आहे. 

मंगळवारी (ता. 19) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पो.ना. हजरत पठाण, पो. ना. निंबाळकर, पो. कॉ. कुलकर्णी हे उदनवाडी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कॅनॉलच्या शेजारी मोकळ्या शेतात पाच बैल व घोडा जोडीच्या गाड्या व काहीजण हातात चाबुक घेऊन उभे असलेले दिसून आले.

पोलिसांना पाहताच पळून जाणाऱ्या त्यातील विजय अलदर यास ताब्यात घेतले. त्याची सर्व चौकशी करून इतर साथीदार यांचीही नावे विचारली असता त्याने धनाजी सरगर (रा. काळामळा, उदनवाडी) नवनाथ वलेकर, साईनाथ सरगर, बापूराव सरगर (रा. उदनवाडी), भीमराव लवटे (रा. बुद्धेहाळ) असे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आम्ही सर्वजण मिळून बैल, घोडा गाडी शर्यतीचा सराव करण्यासाठी तसेच शर्यती लावण्याच्या उद्देशाने एकत्रित आलो आहोत असे सांगितले.

याबाबत शासनाच्या आदेशाचा भंग करीत उदनवाडी (ता. सांगोला) येथे बैलगाडी व घोडागाडी यांच्या शर्यतीचा सराव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याने या प्रकरणी पो. ना. हजरत पठाण यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

दुसरी घटना 
लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात याअगोदर घेरडी (ता. सांगोला) येथे बैल व घोडागाडीच्या शर्यतीच्या आयोजन करणाऱ्या संयोजकांसह व बैल, घोडागाडी 10 चालकांविरोधात 31 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुक्‍यातील ही घटना ताजी असतानाच 19 मे रोजी पुन्हा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com