मनोरंजनासाठी फेसबुक, यूट्यूबकडे कल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी गर्दीची ठिकाणं बंद केली आहेत. याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. सिनेमा, मालिकांचे चित्रीकरणही बंद आहे. सर्वजण घरात बसुन असल्याने मनोरंजनासाठी इतर घटकांबरोबर सोशल मीडियाचे फेसबुक व युट्यूबवरील व्हिडीओ पाहण्याला पसंदी दिली जात आहे.

सोलापूर : कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी गर्दीची ठिकाणं बंद केली आहेत. याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. सिनेमा, मालिकांचे चित्रीकरणही बंद आहे. सर्वजण घरात बसुन असल्याने मनोरंजनासाठी इतर घटकांबरोबर सोशल मीडियाचे फेसबुक व युट्यूबवरील व्हिडीओ पाहण्याला पसंदी दिली जात आहे.
कोरोना व्हायरसने प्रत्येक घटकावर परिणाम केला आहे. लॉकडाऊनमुळे अपवाद वगळता प्रत्येक व्यक्ती घरात बसून आहे. त्यामुळे दिवसभर घरात बसून काय करणार? उद्याने, मॉल, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे सध्या मनोरंजनासाठी युट्यूब आणि फेसबुकला मोठ्याप्रमाणात पसंदी दिली जात आहे. युट्यूबवर हव ते मिळत आहे. म्हणजे जुने सिनेमा, मालिकांचे एपीसोड, तरुणाईचे कल्पकतेतून साकारलेले व्हिडीओ मोठ्याप्रमाणात अपलोड होत आहेत. 

टिकटॉक...
युट्यूबवर सध्या टिकटॉकचे नवनवीन व्हिडीओ आहेत. नव्याने कलाक्षेत्रात येऊ पाहणार्या कलाकारांसाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. आपलेच सर्वाधीअ फॉलोअर्स व्हावेत म्हणून अनेकजण एकास एक व्हिडीओ करत आहेत. यातून लाईकही खूप मोठ्याप्रमाणात मिळत आहेत. याला व्ह्युज ही जास्त मिळत असल्याने प्रोत्साहन मिळत आहे. याबरोबर कोणाला किती व्ह्यूज मिळाले यावरुन स्वत:लाही बदल करून व्हिडीओ अपलोड करता येतात. त्यातून काहीप्रमाणात पैसेही मिळतात.

फेसबुक
फेसबुक हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रीय आहे. याला सर्वात जास्त पसंदी आहे. यावर दररोज अनेक व्हिडीओ अपलोड होतात. त्यातील कंटेटनुसार व्ह्यूजही मोठ्याप्रमाणात मिळतात. यावर लाईव्ह करण्याचे प्रमाणही मोठे आहे. एखाद्याच्या घरी छोटामोठा कार्यक्रम असला तरी लाईव्ह केले जातात. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात बसून असल्याने असेही जुने व्हिडीओ पाहण्याकडे कल आहे. याबरोबर व्हाॅट्स अॅपवरही मनोरंजनासाठी अनेक विनोदी पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्याचा  आनंद घेतला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown leads to Facebook and YouTube for entertainment