लॉकडाउन हा अंतिम उपाय नाहीच ; नागरिकांच्या प्रतिक्रिया

corona vaccine.jpg
corona vaccine.jpg

सोलापूर : कमी झालेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. अनलॉक करताना सरकारने जे निर्बंध घातले, त्याचे पालन न झाल्याचा परिणाम दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राज्यभर पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन होईल, अशी चिंता वाढली आहे. मात्र, लॉकडाउन हा कोरोनावरील अंतिम उपाय नसून सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता या तीन नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोना हद्दपार होईल, असा विश्‍वास सोलापूरकरांनी व्यक्‍त केला आहे. 
राज्यात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर तब्बल 70 दिवसांहून अधिक दिवस कडक लॉकडाउन करण्यात आला. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकला नाही. मात्र, खूप दिवसांनी आपण कोरोना कमी करण्यात यश मिळविले. आता पुन्हा निर्बंध पाळले न गेल्याने कोरोना वाढू लागला आहे. कोरोना जाण्यासाठी नेमके काय करायला हवे, हे आता सर्वांना माहिती झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकांनी ते नियम पाळायला हवेत. जेणेकरुन कोरोना वाढणार नाही आणि काही दिवसांत कोरोना हद्दपार होईल. विवाहासाठी गर्दी करणे टाळायला हवे, राजकीय सभा, आंदोलने, मोर्चे काढू नयेत. जेणेकरुन कोरोनाला आवर घालणे शक्‍य होईल. राज्यात पुन्हा काही दिवसांचा कडक लॉकडाउन केल्यास बेरोजगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच बॅंक आणि खासगी सावकारकीच्या ओझ्याखाली अनेकजण आत्महत्या करतील, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकीतून नियमांचे पालन केल्यास कोरोना हद्दपार होऊ शकतो. 

 कोरोनाला हरविण्याची गरज
राज्यात अगोदरच बेरोजगारी खूप असून लॉकडाउनमुळे पुन्हा बेरोजगारी वाढेल. शाळा अनेक महिन्यांनंतर सुरु झाल्या असून मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, नागरिकांनी नियम न पाळल्याने पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आली. सर्वांनी नियमांचे पालन करुन कोरोनाला हरविण्याची गरज आहे. 
- संध्या भिंगारे, शिक्षिका 

 परिस्थिती बिकट होईल
सोलापुरात विडी उद्योग व बांधकाम, टेक्‍स्टाईल, गारमेंट उद्योगात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना काम केल्यावरच पोटभर खायला मिळते. पहिल्या लॉकडाउननंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यातच पुन्हा कडक लॉकडाउन झाल्यास आणखी परिस्थिती बिकट होईल. त्यामुळे नियमांचे पालन करावेच लागेल. 
- ज्योती पाटील, शिक्षिका 

नियम पाळायलाच हवेत
निर्बंध घालूनही अनेकांनी त्याचे पालन केले नाही. दंड भरूनही अनेकजण मास्क वापरत नाहीत. कोरोना वाढू नये, म्हणून प्रत्येकांनी नियम पाळायलाच हवेत. नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोनाला आपण हरवू शकतो. पूर्णवेळ लॉकडाउन केल्यास राज्य पुन्हा काही वर्षे मागे जाईल. 
-मनिषा लोंढे, शिक्षिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com