लोकमंगल बॅंकेचा "एक हात सहकार्याचा आणि मदतीचा' उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

ठेवीच्या 90 टक्के कर्ज 
या काळात मुदत ठेवींवर कर्ज घेणाऱ्यांना एक टक्के जादा व्याजदाराने व ठेवीच्या 90 टक्के कर्ज देण्यात येईल, असे बॅंकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. तरी या योजनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन लोकमंगल बॅंकेच्या संचालक मंडळाने केले आहे. 

सोलापूर ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे, व्यवसाय अडचणीत आले आहेत. ते अर्थसहाय्याअभावी बंद पडू नये, त्यांना पुन्हा नव्याने चालना मिळावी म्हणून लोकमंगल बॅंकेने "एक हात सहकार्याचा आणि मदतीचा' हा संकल्प राबविला आहे. या संकल्पाद्वारे सर्वांना कमी दरात अर्थसहाय्य करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. कमी कागदपत्रात त्वरित अर्थसहाय्य मिळणार असल्यामुळे जनतेला सक्षमपणे कोरानाच्या संकटाला सक्षमपणे उत्तर देता येणार आहे. 

लोकमंगल बॅंकेकडून कर्ज योजना सुरू झाली आहे. सुरूवातीला पहिले सहा महिने केवळ त्रैमासिक व्याज भरणा करता येईल. सहा महिन्यानंतर मुद्दल आणि व्याज सुरू करता येईल. एक कोटीच्या पुढील कर्जासाठी बॅंकेचा प्रतिनिधी कर्जदाराची रक्कम त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणाहून बॅंकेत आणून भरेल. त्यामुळे कर्जदाराच्या व्याजात बरीच घट होणार आहे. वाहन कर्जासाठी 11 तर गृहकर्जासाठी 10 टक्के व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध आहे. महिलांना बॅंकेच्या बचत गटाच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे. बचत गटामार्फत ब्युटीपार्लरच्या ग्रुपला 50 हजारांचे विनातारण अर्थसहाय्य देण्यास बॅंकेने सुरू केले आहे. 

ज्या कर्जदारांचे कर्जखाते नियमित आहे, त्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्याची आवश्‍यकता आहे, अशांना जादा तारण घेऊन वाढीव अर्थसहाय्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांचे जिल्ह्याच्या बाहेर व्यवसाय आहेत त्यांना तोच व्यवसाय सोलापुरात सुरू करायचा आहे, अशांनाही अर्थसहाय्याची सोय करून देण्यात आली आहे. समान व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा ग्रुपकरून पाच लाखांपर्यंत विनातारण अर्थसहाय्याची सोयही बॅंकेने केली आहे. ही योजना 15 ऑगस्टपर्यंतच लागू असणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmangal Bank's "One Hand Cooperation and Help" initiative