"लोकमंगल' सामुदायिक विवाह सोहळा 27 डिसेंबरला 

प्रमोद बोडके
Friday, 20 November 2020

विवाह इच्छुक वधू-वराच्या पालकांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकमंगल बॅंक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल साखर कारखाना, लोकमंगल मल्टीस्टेट, लोकमंगल जीवक हॉस्पिटल या ठिकाणी नोंदणी करावी. 

सोलापूर : लोकमंगल फांउडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा 27 डिसेंबर रोजी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन मर्यादित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शहाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विजय जाधव उपस्थित होते. लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने यंदा आयोजित केला जाणारा हा 14 वा विवाह सोहळा आहे. आजपर्यंत फाऊंडेशनच्या माध्यमातून 2 हजार 881 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे यंदा विवाह मिरवणूक, लक्ष भोजन टाळण्यात येणार आहे. विवाह सोहळा सोहळ्यासाठी अधिक नोंदणी झाल्यास टप्प्याटप्प्याने एकाच दिवशी मोजक्‍या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Lokmangal" Community Wedding Ceremony on 27th December