बुधवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनल ते मदुराई रेल्वे सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway.jpg

गाडी क्र. 01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई ही विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक बुधवारी रोजी दुपारी 01.15 वाजता सुटेल. पुढील स्थानक ठाणे, कल्याण, पुणे, दौंड मार्गे रात्री 8.50 वाजता पोहोचेल. नंतर कलबुर्गी आगमन रात्री 10.22, शाहबाद आगमन रात्री 10.58, वाडी आगमन रात्री 11.20, रायचूर, मंत्रालयमरोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, कडप्पा, राजमपेठा, रेनिगुंटा, तिरूत्तनी, कांचीपुरम, चेंगलपट्टू, विलुप्पुरम, वृध्दाचलम, तिरूच्चिराप्पल्लि, दिंडुक्कल आणि मदुराई स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी 06.10 वाजता पोहचेल. 

बुधवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनल ते मदुराई रेल्वे सुरू होणार

सोलापूर: मध्य रेल्वेने ता. 17 मार्चपासून लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस सुरू होत आहे. 
गाडी क्र. 01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई ही विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक बुधवारी रोजी दुपारी 01.15 वाजता सुटेल. पुढील स्थानक ठाणे, कल्याण, पुणे, दौंड मार्गे रात्री 8.50 वाजता पोहोचेल. नंतर कलबुर्गी आगमन रात्री 10.22, शाहबाद आगमन रात्री 10.58, वाडी आगमन रात्री 11.20, रायचूर, मंत्रालयमरोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, कडप्पा, राजमपेठा, रेनिगुंटा, तिरूत्तनी, कांचीपुरम, चेंगलपट्टू, विलुप्पुरम, वृध्दाचलम, तिरूच्चिराप्पल्लि, दिंडुक्कल आणि मदुराई स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी 06.10 वाजता पोहचेल. 
गाडी क्र.01202 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस ता. 19 मार्चपासून धावेल. ही गाडी मदुराई स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी रोजी दुपारी 03.50 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दिंडुक्कल, तिरूच्चिराप्पल्लि, वृध्दाचलम, विलुप्पुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरूत्तनी, रेनिगुंटा, राजमपेठा, कडप्पा, गुत्ती, गुंटकल, अदोनी, मंत्रालयमरोड, रायचूर, वाडी आगमन सकाळी 10.10, शाहबाद सकाळी 10.33, कलबुर्गी आगमन सकाळी 10.52, सोलापूर आगमन दुपारी 12.20, दौंड आगमन दुपारी 03.15, पुणे, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावर शनिवारी रात्री 08.20 वाजता पोहचेल. या गाडीस एकूण 22 कोच असतील. 
कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. या गाड्या पूर्ण गाडी आरक्षित असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.  
 
Web Title: Lokmanya Tilak Terminal Madurai Train Will Start Wednesday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top