कोरोना : शेतात उन्हानं सडुन चालेली कलिंगड बघुन पोटात आग पडतीया...

The loss of millions of farmers due to corona
The loss of millions of farmers due to corona

करमाळा (सोलापूर) : शेतात उन्हानं सडुन चालेली कलिंगड बघुन पोटात आग पडतीया... काय करावं कळत नाही, लयमोठा खर्च करून चार एकर कलिंगड केले. माञ झालेला खर्च सुध्दा निघाला नाही, ही व्यथा सांगत आहेत अंजनडोह (ता. करमाळा) येथील शेतकरी शाहाजी माने. ते बोलत असताना अस्वस्थ होते.
माने यांच्या सारखीच परिस्थिती करमाळा तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतक-यांची झाली आहे. तालुक्यातील वीट, अंजनडोह, झरे, वरकटणे, गुळसडी, चिखलठाण, मांगी, पोथरे, सौंदे, गुळसडी, पोफळज, उमरड, वांगी, राजुरी, बिटरगाव (श्री) भागात मोठ्याप्रमणावर कलिंगडाची लागवड झाली आहे. सध्या कलिंगड उत्पादन शेतकरी हातबल झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. अशातच शेतक-यांच्या कलिंगड या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसून येत आहे. उन्हाने कलिंगडला सुरवातीला पांढरे डाग पडत आहेत. त्यानंतर ते कलिंगड आतुन खराब होत आहे. १० दिवसांपूर्वी माने यांच्या शेतातील कलिंगड काढणीसाठी आले होते. मात्र संचारबंदी करण्यात आल्यानंतर कलिंगड विक्री करणे अवघड झाले आहे. माने यांनी मोठ्या प्रयत्नांनी एक टेम्पो भरून कलिंगड पुणे येथे घेऊन गेले. मात्र त्या ठिकाणी दोन रुपये, तीन रुपये किलो दराने कलिंगड विक्री करावी लागली, त्यातून त्यांचा खर्चदेखील निघाला नाही. कोरोनाच्या नावाखाली व्यापा-यांनी शेतक-यांची लुट सुरू केली आहे. 

चार एकरासाठक्ष तीन लाख खर्च
चार एकर कलिंगडची लागवड केली. यासाठी साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. यातून त्यांना किमान दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनेत माझ्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कलिंगड योग्य वेळी विकू न शकल्यामुळे सर्व कलिंगड खराब झाली आहेत.
- शहाजी माने, शेतकरी, अंजनडोह

शेतमाल विक्रीची व्यवस्था
शासनाने शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी नेहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीस पाठवायचा आहे. त्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत माहीती घेऊन शेतीमाल विक्री करावा. शेतक-यांचे नुकसान होणार नाही यांची शासन काळजी घेत आहे.
- समीर माने, तहसीलदार, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com