राहुलने बसस्टॉपवर केले 'अश्विनी'ला प्रपोज...

सुस्मिता वडतीले
Friday, 14 February 2020

आपण चांगले मित्र म्हणून सोबत राहुयात असे तो म्हणू लागला. हे सारे पाहून आणि ऐकून तिचं मन भरून आलं, न राहवून तिने त्याला सांगितले, मला तु आवडतोस. पुढे जाऊन त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. 2012 हे वर्ष त्या दोघांना आनंद देऊन गेली. तिच्या घरी लग्नाचा विषय सुरू झाला. त्यावेळी तिला काय करावे कळत नव्हते. तिने राहुलला सांगितले. राहुल ने त्याच्या घरी कळविले. त्याच्या घरच्यांनी तिला येऊन मागणी घातली. 

सोलापूर : अश्विनी नर्स असून एका रुग्णालयात काम करत असायची. त्यासाठी ती रोज बस ने प्रवास करत होती. त्यात राहुलशी चांगली ओळख झाली. त्या बस स्टॉप वर दोघांची मैत्री झाली आणि पुढेही मैत्री प्रेमात बदलली. नेहमीप्रमाणे एक दिवस बस स्टॉप वरती उभी असताना त्याने तिला प्रपोज केले. ते ऐकून तिला आश्चर्य वाटले. नंतर ती काहीच न बोलता तिथून निघून गेली. काही दिवस ती त्याच्याशी बोललीच नाही. नंतर त्याने तिला भेटायला बोलावले ती भेटायला हि गेली. भेटल्यानंतर त्याने तिची माफी मागितली.

आपण चांगले मित्र म्हणून सोबत राहुयात असे तो म्हणू लागला. हे सारे पाहून आणि ऐकून तिचं मन भरून आलं, न राहवून तिने त्याला सांगितले, मला तु आवडतोस. पुढे जाऊन त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. 2012 हे वर्ष त्या दोघांना आनंद देऊन गेली. तिच्या घरी लग्नाचा विषय सुरू झाला. त्यावेळी तिला काय करावे कळत नव्हते. तिने राहुलला सांगितले. राहुल ने त्याच्या घरी कळविले. त्याच्या घरच्यांनी तिला येऊन मागणी घातली. 
सुरुवातीला सर्वांचा विरोध होता. मात्र नंतर घरच्या सर्वांनी परवानगी दिली. 2013 ला दोघांचा साखरपुडा झाला. व्हॅलेंटाईन डे चे दिवस सुरू होते. दोघांनी प्रत्येक दिवस साजरा केला. गावात चर्चा सुरू झाली, की साखरपुडा झाला आहे आणि लग्न अजून केले नाही. गावातील चर्चा थांबवावी म्हणून लगबगीने लग्नाची तारीख काढली.  2014ला दोघांचा विवाह झाला. दोघांचा संसार सुखाचा सुरू झाला. 2015 ती आई झाली. सर्व सुखंच तिच्या पदरी पडले. आज सहा वर्षे झाली दोघांचा संसार अगदी आनंदाने सुरू आहे. अश्विनी आणि राहुल व त्यांचा मुलगा रुद्रेश लाईफ एन्जॉय करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love story of Rahul and Ashwini