"राष्ट्रवादी' कार्यकर्त्यांनो तयार राहा, होणार विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड !

संतोष पाटील 
Monday, 25 January 2021

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवती कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, सेवादल, सोशल मीडिया, पदवीधर, डॉक्‍टर, वकील, ग्रंथालय, ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, किसान सभा, कला, क्रीडा व सांस्कृतिक, सामाजिक न्याय, कामगार, सहकार, ज्येष्ठ नागरिक, आयटी सेल आदी सेलचे तालुकास्तरीय पदाधिकारी नव्याने निवडण्याचे ठरविण्यात आले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुका व विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्यात येणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत टेंभुर्णी मार्केट यार्डमधील माढा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी केले आहे. 

आमदार बबन शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची सूचना केली आहे. या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, झुंजार भांगे, रामभाऊ शिंदे, शिवाजी पाटील चांदजकर, शंभूराजे मोरे, तुकाराम ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील - जामगावकर, अप्पासाहेब उबाळे, डॉ. निशिगंधा माळी, अनिता भांगे आदी उपस्थित होते. 

या बैठकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवती कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, सेवादल, सोशल मीडिया, पदवीधर, डॉक्‍टर, वकील, ग्रंथालय, ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, किसान सभा, कला, क्रीडा व सांस्कृतिक, सामाजिक न्याय, कामगार, सहकार, ज्येष्ठ नागरिक, आयटी सेल आदी सेलचे तालुकास्तरीय पदाधिकारी नव्याने निवडण्याचेही ठरविण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विविध क्षेत्रांतील कार्यरत इच्छुक कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी मार्केट यार्डमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयामध्ये केलेल्या सामाजिक व पक्ष कार्य अहवालासह अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील (9822867725), माढा तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी (9975485635), झुंजार भांगे (9921634999), रामभाऊ शिंदे (9423332994) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Madha taluka a new taluka level office bearer of NCP will be elected