हिरवाईचा जादुगार : राजेंद्र आमले; एअर व वॉटर लेअरींगसाठी सर्वांना देतात मोफत मार्गदर्शन 

Rahul Amle.jpg
Rahul Amle.jpg
Updated on

सोलापूर ः वयाची 65 वर्षे हा निवृत्तीचा काळ.... निरोगी जीवनशैली....पण तरुणासारखा सळसळता उत्साह घेऊन ते पारंपरिक कलम व एअर लेअरींगसाठी मोफत मार्गदर्शन करत हिरवाईचा वसा घेऊन अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड आता केवळ सोलापूरपुरती मर्यादीत राहिली नाही. तर पुणे, कोल्हापूर व सांगली शहरात देखील ही चळवळ पोहोचवली आहे राजेंद्र आमले यांनी. 

रुपाभवानी सर्कल परिसरातील जयराज गृहसंकुलात राजेंद्र आमले राहतात. पूर्वी घरी शेती होती तेव्हा ते शेतीचे काम करत असत. नंतर मागील काही वर्षापासून सोलापूर शहरात स्थायिक झाल्यानंतर मागील आठ ते दहा वर्षापासून वृक्षांबाबत अनेक प्रयोग करू लागले. विशेषत ः कलम म्हणजे ग्राफ्टिंगचे तंत्र त्यांनी विकसित केले. पांरपारिक कलमाच्या प्रकार त्यांनी अधिक लोकापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे हे काम सुरु झाले. 

विशेष म्हणजे वाढत्या वयात देखील त्यांनी या कामात लोकांना मदत करण्यास सुरवात केली. पहिल्यांदा त्यांनी कलमाचे यश लोकांना कळवण्यासाठी घराबाहेर जास्वंदाच्या झाडावर पाच प्रकारचे रंग असलेल्या फुलांची कलमे त्यावर केली. आजही या जास्वंदीला पाच प्रकारची फुले येतात. नंतर त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या कलम तयार करण्याचे काम सुरु झाली. त्यांच्या अंगणात अनेक प्रकारची रोपे तयार करणे व कलम लावलेली झाडे ते तयार करतात. डोळा भरणी, पाचर, दाब कलम, जोड कलम यासह गुटी कलम करण्याचे ते मोफत प्रशिक्षण ते वृक्षप्रेमींना देत असतात. गुटी कलममध्ये दर झाडाच्या भागात कलम केली जाते तेथे दोन महिन्यात मुळ्या फुटतात. त्यामुळे एक झाडाची दोन झाडे तयार होतात. बि रुजवणे व रोप तयार न करता थेट नविन झाडे बनते. तसेच एअर लेअरिंग व वॉटर लेअरिंग या दोन प्रकारातून देखील थेट एका झाडाच्या फांदीतून दुसरे झाड तयार होते. यामुळे नवीन झाडे तयार करण्याचा कालावधी अगदी कमी होतो. या प्रकाराचा हा सर्वात मोठा फायदा आहे. 

या गृहसंकुलामध्ये असलेल्या सर्वच शेजाऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेऊन संपूर्ण संकुलाचा परिसर हिरवेगार केले आहे. संकुलातील सर्व पालापाचोळ्याचा कचरा महापालिकेला न देता त्यापासून खते तयार होऊ लागली. त्यांनी सोलापूर नव्हे तर सांगली, कोल्हापूर व पुणे भागातील निसर्गप्रेमींना देखील मोफत मार्गदर्शन करतात. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात हिरवाईच्या चळवळीला मदत होऊ लागली आहे. वयाची 65 वर्षे झाली तर राजेंद्र आमले हे आजही आठ तास निरोगी जीवनशैलीतून हे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांना आता कलमबहाद्दर अशी वेगळी ओळख निसर्गप्रेमीमध्ये मिळाली आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com