उपचाराच्या बहाण्याने मांत्रिकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! विवाह न करताच त्यांना झाली एक मुलगी अन्‌ पुढे... 

तात्या लांडगे
Saturday, 12 September 2020

"अशी' आहे त्याच्या घरची परिस्थिती 
तरटगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शिवाजी सिद्राम कोल्हे याची पाच एकर शेजजमीन आहे. त्याला एक भाऊ असून तो लॉकडाउननंतर पुण्यात वाहनचालक म्हणून कामासाठी गेला आहे. हा शिवाजी आठवड्यातून एक-दोनदा शेताकडे ये-जा करीत होता. त्याचे वडील महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी कोल्हे याचा विवाह झाला नसून तो पत्रा तालिमजवळील काळी मशिदीजवळ तांत्रिक विद्या करीत होता. 

सोलापूर : मुलगा सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबापासून वारंवार दूर राहिला. 2015 पासून तो सोलापुरात घर करून मांत्रिक म्हणून काम करीत होता. त्यावेळी महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलाने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, अशी माहिती पोलिस तपासांत समोर आली आहे. त्याच्या सोलापुरातील घरात मांत्रिक विद्येचे साहित्य सापडले असून त्याच्याविरुध्द आता नवा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे यांनी दिली. 

"अशी' आहे त्याच्या घरची परिस्थिती 
तरटगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शिवाजी सिद्राम कोल्हे याची पाच एकर शेजजमीन आहे. त्याला एक भाऊ असून तो लॉकडाउननंतर पुण्यात वाहनचालक म्हणून कामासाठी गेला आहे. हा शिवाजी आठवड्यातून एक-दोनदा शेताकडे ये-जा करीत होता. त्याचे वडील महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी कोल्हे याचा विवाह झाला नसून तो पत्रा तालिमजवळील काळी मशिदीजवळ तांत्रिक विद्या करीत होता. 

त्या परिसरातील एका मुलीस फिट येत असल्याने तिच्या पालकांनी तिला 2015 मध्ये मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले. दोन वर्षे उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने ओळख वाढविली आणि तिच्या घरी ये-जा करू लागला. त्यानंतर 2017 मध्ये त्याने त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. आता ती मुलगी एक वर्षाची असून त्या मुलीने त्याला विवाहासाठी हट्ट लावला होता. मात्र, त्याने विवाह करण्यास नकार दिला, घरी येणे बंद करुन धान्य, वस्तू देणेही बंद केल्याने अखेर तिने पोलिस ठाणे गाठले. आता सदर बझार पोलिस त्याचा शोध घेत असून तो मोबाइल बंद करून पसार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याच्या घरात मोर पिसे, लिंबू, कुंकू, हिप्नॉटिझमची पुस्तके पोलिसांना सापडली आहेत. त्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Magician tortures minor girl under the pretext of treatment! They had a daughter without getting married