esakal | महिलांमध्ये "मैत्रिण' निर्माण करेल आत्मविश्‍वास, "सकाळ'च्या "मैत्रिण' योजनेचा सोलापुरात शुभारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

"सकाळ'चे नेहमीच चांगले उपक्रम असतात. महिलांमध्ये मोठी शक्ती आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होईल. समाजातील सर्वच क्षेत्रातील महिलांपर्यंत ही योजना पोहचावी. 
- प्रणिती शिंदे, आमदार 

महिलांमध्ये "मैत्रिण' निर्माण करेल आत्मविश्‍वास, "सकाळ'च्या "मैत्रिण' योजनेचा सोलापुरात शुभारंभ 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये गेल्या सहा ते सात महिन्यांपासून महिलांना नवीन काही करण्याची संधी मिळालेली नाही. "सकाळ'ने महिलांसाठी जाहीर केलेल्या मैत्रिण योजनेतून महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढेल. महिलांना घरबसल्या नवीन काही तरी शिकण्याची आणि करण्याची संधी मिळेल. या योजनेतील आकर्षक बक्षिसांचाही महिलांना लाभ होईल, असा विश्‍वास सोलापुरातील विविध क्षेत्रातील महिलांनी आज व्यक्त केला. 

"सकाळ'ने महिलांसाठी सुरू केलेल्या अभिनव मैत्रिण योजनेचा जिल्ह्यातील शुभारंभ आज "सकाळ'च्या सोलापूर कार्यालयात झाला. त्यावेळी महिलांनी हा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे, ऍड. वैशाली चालुक्‍य-गोएल, शेतकरी अंबिका पाटील, सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा गव्हाणे, हॉटेल सूर्याच्या संचालिका वैशाली सुरवसे, उद्योजिका कामिनी गांधी यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. "सकाळ'चे सहयोग संपादक अभय दिवाणजी यांनी स्वागत केले. "सकाळ'चे सहाय्यक वितरण व्यवस्थापक अनिल जोशी यांनी योजनेची माहिती सांगितली. 

महिलांना संधी 
या योजनेच्या माध्यमातून "सकाळ'ने सर्वांसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेतून मिळणाऱ्या बक्षिसांचा महिलांना चांगला लाभ होईल. महिलांना संधी, समाधान देणारा आणि त्यांच्या ज्ञानात अधिकची भर टाकणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमात महिलांनी सहभागी व्हावे. 
- श्रीकांचना यन्नम, महापौर 

दिसण्या पेक्षा असण्याला प्राधान्य 
महिलांना स्वत:ला वेगळे समजू नये. महिला या समाजाचाच एक महत्वाचा घटक आहेत. महिलांनी दिसण्या पेक्षा असण्याला प्राधान्य द्यावे. काळानुरुप दिसणे बदलते परंतु असणे शेवटपर्यंत कायम राहते. "सकाळ'च्या मैत्रिण योजनेतून महिलांना नवीन काही तरी करण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली आहे. 
- डॉ. दिपाली धाटे, पोलिस उपायुक्त