सिध्देश्‍वर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून कावळे 

mallikarjun digital.jpg
mallikarjun digital.jpg
Updated on

सोलापूरः येथील श्री सिध्देश्‍वर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून बाबुराव कावळे यांची निवड करण्यात आली आहे. 
श्री सिध्देश्‍वर शिक्षण मंडळाच्या विश्‍वस्त मंडळाची विशेष सभा आज संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावळशी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.एस.आर.पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून कावळे यांचे नाव सुचवले. त्यास राजेंद्र मायनाळ यांनी अनुमोदन दिले. ही निवड बिनविरोध झाली. मल्लिकार्जून कावळे हे 1991 पासून संस्तेचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, बटरफ्लाय इंग्लिश मिडियम स्कूल व विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या शैक्षणिक उपक्रमामध्ये ते कार्यरत आहेत. 
या सभेसाठी मावळते अध्यक्ष प्रा. गंगाधर कुमठेकर, उपाध्यक्ष एस.आर.पाटील, संस्थेचे सचिव डॉ. शशिकांत हलकुडे, सहसचिव अनिल सिंदगी, खजिनदार बी.एस.बिराजदार, विश्‍वस्त शंकर पाटील, शरद नागांबकर, वैजनाथ देवणीकर, प्रभुदेव तोंडारे, गजानन धरणे, धनेश स्वामी, सिध्देश्‍वर मुनाळे, राजेंद्र मायनळ उपस्थित होते.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ashadhi Wari 2026: Warkaris Stay Firm on Alandi Route Despite Heavy Rain Warning
zp schools
Dal chaval Recipe
RTO Office meeting
Marathi News Esakal
www.esakal.com