माळशिरस, पंढरपूरमध्ये सर्वाधिक ऍटिव्ह रुग्ण, नव्या 547 बाधितांची भर : 13 जणांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Monday, 14 September 2020

कोरोनाचा एकेकाळी हॉटस्पॉट झालेल्या सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बाधितांची संख्या कमी झाली आहे. बार्शीतील कोरोनाचा जोर अद्यापही कायम आहे. बार्शीसोबतच आता पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्‍यातही बाधितांची संख्या वाढू लागली आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 25 हजार 386 झाली असून त्यातील 17 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 950 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात 6 हजार 835 जणांवर उपचार सुरु आहेत. सर्वाधिक ऍक्‍टिव्ह (उपचार सुरु असलेले) रुग्ण माळशिरस तालुक्‍यात 1058 तर त्या पाठोपाठ पंढरपूर तालुक्‍यात 1040 एवढे आहेत. बार्शीत 939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आज महापालिका हद्दीत 28 तर ग्रामीण भागात 519 अशा एकूण 547 नव्या बाधितांची भर पडली आहे. ग्रामीणमधील दहा व महापालिका हद्दीतील तीन अशा एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. आज 427 जण कोरोनामुक्त झाले असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील 53 तर ग्रामीण भागातील 374 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 108 अहवाल अद्यापही प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malshiras, Pandharpur has the highest number of active patients, adding 547 new cases: 13 die