
माळशिरस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 1851 पैकी 848 उमेदवारांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्याने आता 913 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 1851 पैकी 848 उमेदवारांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्याने आता 913 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तहसीलदार जगदीश निंबाळकर व नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान, तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मिळून 40 व अन्य 18 ग्रामपंचायतींच्या मिळून 50 अशा तालुक्यातील एकूण 90 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. आशिया खंडात सर्वांत मोठी समजली जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध झाली असून, उर्वरित 16 जागांसाठी 47 उमेदवारांनी दंड थोपटल्याने नगरपरिषद होण्यासाठी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर अखेर येथील निवडणूक लागली आहे.
सोमवारी (ता. 4) अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. महाळुंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. अनेक ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती (कंसात सदस्य संख्या) :
गोरडवाडी (11), मिरे (9), गिरझणी (11), बाभूळगाव (9).
ग्रामपंचायतनिहाय निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या (कंसात बिनविरोध झालेल्या जागा) :
विजयवाडी 19, येळीव 16 (1), रेडे 22, मांडकी 19, चाकोरे / प्रतापनगर 22, विझोरी 24, बचेरी 12 (3), बांगर्डे 18, पिरळे 23, जळभावी 17, मांडवे 40, गारवाड / मगरवाडी 20 (1), तांदूळवाडी 38, तोंडले 16 (1), बिजवडी 14, माळखांबी 26, शिंगोर्णी 23, नातेपुते 21 (7), मळोली / साळमुखवाडी 31, संग्रामनगर 31, बोंडले 18, गिरवी 22, कुसमोड 12 (3), कोंडबावी 23, तांबवे 23, विठ्ठलवाडी 16, फडतरी / निटवेवाडी / शिवारवस्ती 16 (3), एकशिव 22 (1), अकलूज 47 (1), बोरगाव 34, दसूर 18, फोंडशिरस/मोटेवाडी 31 (3), शेंडेचिंच 12 (1), गणेशगाव 14, लोणंद 14 (2), कोथळे 12 (3), शिंदेवाडी 15 (4), कुरबावी 2 (8), भांब 8 (5), उंबरे वेळापूर 20, खळवे 16 (1), कळंबोली 14, मोरोची 26, पिंपरी 22 (2).
संपादन : श्रीनिवास दुध्याल