करमाळ्यात नियम तोडून कृषी सेवा केंद्रांचा चालतोय कारभारः कोणी केली तक्रार ते वाचा

krushi kendra.jpg
krushi kendra.jpg

करमाळा(सोलापूर): करमाळा तालुक्‍यातील कृषी सेवा केंद्र शेतक-यांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देत नसल्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

करमाळा तालुक्‍यातील कृषी सेवा केंद्राविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत मध्यमहाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे प्रांत सचिव भालचंद्र पाठक यांनी ही तक्रार केली आहे. यापूर्वी वारंवार मागणी करून देखील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नसल्याने ग्राहक पंचायतीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मालाच्या साठ्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्‍यक असतानाही कोणत्याही ठिकाणी फलक दिसून येत नाही. याशिवाय अधिकृत परवाना प्राप्त असल्याचा फलक, जीएसटी नोंद फलक, खते बियाणे गोण्यांचे वजन मोजण्यासाठी वजन काटा अनेक ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. खते उपलब्ध असताना देखील एखाद्या खताची विक्री करण्यासाठी त्याबरोबर दुसरे खत घेण्याचा आग्रह दुकानदारांकडून धरला जातो. त्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करावेत अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. 
याशिवाय ओट्यावर रस्त्यावर खते,बियाणे विक्री करणाऱयांवर कारवाई करावी ,मुदत संपलेली औषधे, खते ,बियाणे कृषी सेवा केंद्रात आढळून येत असून त्याची विक्री होत आहे ही बाब गंभीर आहे याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे याशिवाय कृषी सेवा केंद्रात विक्री रजिस्टर ,खते ,बियाणे ,औषधे दुकानदाराने खरेदी केली तिची नोंद रजिस्टर तसेच अधिकारी भेट दिले त्याचे नोंद रजिस्टर ठेवणे आवश्‍यक आहे.याशिवाय कोणतेही खत बियाणे व इतर साहित्य घेतल्यास त्याची पावती द्यावी अशा मागण्या ग्राहक पंचायतीकडुन करण्यात आल्या आहेत. 

कारवाई करणे महत्वाचे 
करमाळा तालुक्‍यातील कृषी सेवा केंद्राविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्या बाबत कारवाई केली जात नाही. 
-भालचंद्र पाठक, प्रांत सचिव मध्यमहाराष्ट्र, ग्राहक पंचायत 

तपासणी केली जाईल 
कृषी सेवा केन्द्राच्या तपासण्या करत आहोत.जे कृषी सेवा केंद्र दोषी आढळले त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.ज्या दुकानदारांना सुचना दिल्या आहेत. त्यांनी सुधारणा न केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. 
- सुरज पाटील ,तालुका कृषी अधिकारी,करमाळा  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com