बिनविरोधची मुढवी ग्रामपंचायतीची परपंरा कायम ! दाखल अर्जांमधून किती बाद होतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष

mudhvi.
mudhvi.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 894 उमेदवारांनी 910 अर्ज दाखल केले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज मरवडे, बोराळेचे दाखल झाले. कायमस्वरूपी तालुक्‍यातील कोणत्याही राजकीय नेत्याचे आवाहन न स्वीकारता सलग 30 वर्षे मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परपंरा या वेळी कायम राहिली आहे. या निवडणुकीत तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गावांचा या आखाड्यात समावेश आहे. त्यामुळे उर्वरित चार दिवसांत त्यांची गावे कोरोना संकटात बिनविरोध होतात की निवडणुका लागतात? याकडे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन करण्यात आले होते, परंतु सर्व्हर डाउन झाल्यामुळे शासनाने अंतिम दिवशी ऑफलाइन अर्ज दाखल करण्याचा पर्याय उमेदवारांसमोर ठेवल्यामुळे तहसील कार्यालयाला बुधवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रत्यक्ष गर्दीची परिस्थिती पाहता मंगळवेढ्यातून कोरोना हद्दपार झाला की काय, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. आता अर्ज छाननीत किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायतनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
मरवडे 74, लमाण तांडा 31, तांडोर 29, सिद्धापूर 51, कात्राळ 21, आसबेवाडी 29, बोराळे 74, गणेशवाडी 37, डोणज 42, हुलजंती 71, महमदाबाद शे. 19, मल्लेवाडी 19, नंदेश्वर 67, लेंडवेचिंचाळे 42, लवंगी 31, अरळी 3, सलगर बुद्रूक 49, माचणूर 36, तामदर्डी 24, घरनिकी 18, भोसे 60, कचरेवाडी 38 इतके अर्ज दाखल झाले. 

नंदेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर रुग्णवाहिका भेट देण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा होताच, चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पवार यांनी, 35 गावांच्या पाणी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात खळबळ उडवून देणारे सलगर बुद्रूक गाव जर बिनविरोध होत असेल तर एक लाख रुपये देण्यास तयार असल्याची घोषणा केली. उर्वरित चार दिवसांत गावगाड्यासह तालुक्‍यातील नेत्याला ग्रामपंचायती बिनविरोध करण्यास यश येते काक्ष्‌ हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com