मराठा क्रांती ठोक मोर्चा : सोलापूर शहरात आसूड ओढा आंदोलनाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 21 September 2020

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंदचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर आज संपूर्णपणे बंद असून जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पार्क चौकात आसूड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, किरण पवार यांच्यासह मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते जमा झाले आहेत. 

सोलापूर : माढ्यात टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सोमवारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी सोलापूर बंदची हाक दिली आहे. त्यानुसार सकाळपासूनच शहर व जिल्ह्यात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून, माढ्यात रस्त्यावर टायर जाळून जिल्ह्यातील आंदोलनाला सुरवात झाली आहे. 

सोलापूरमध्ये कडकडीत बंद 
मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंदचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर आज संपूर्णपणे बंद असून जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पार्क चौकात आसूड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, किरण पवार यांच्यासह मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते जमा झाले आहेत. शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. 

सकल मराठा समाजाच्या वतीने आसूड ओढा आंदोलन करण्यात येत असून, सकाळी शिवाजी चौक ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानावर, सकाळी 10 वाजता डाक बंगला ते आमदार प्रणिती शिंदे यांचे निवासस्थान, सकाळी 11 वाजता डी मार्ट ते आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थान, तसेच शेळगी उड्डाण पूल ते खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे निवासस्थान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morchas agitation started in Solapur city