जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माढ्यातून टायर पेटवून सुरवात

किरण चव्हाण 
Monday, 21 September 2020

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोमवारी माढा तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरवातच पहाटे साडेपाचच्या सुमारास माढा बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी टायर पेटवून केली. पहाटेच्या सुमारास माढ्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंभूराजे साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

माढा (सोलापूर) : माढ्यामध्ये बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमवारी ्‌(ता. 21) पहाटे साडेपाचच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी टायर पेटवून आंदोलन केले. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोमवारी माढा तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरवातच पहाटे साडेपाचच्या सुमारास माढा बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी टायर पेटवून केली. पहाटेच्या सुमारास माढ्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंभूराजे साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. 

या वेळी "एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी शंभूराजे साठे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा, पोलिस भरती स्थगित करावी, शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून आरक्षण द्यावे अशा मागण्या केल्या. माढ्यातील भल्या पहाटेच झालेल्या या आंदोलनामुळे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाला सुरवात झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Maratha reservation movement in the district started by burning tires in Madha