
सोलापूर : एप्रिल 2020 मध्ये कोरोनाने सोलापूर शहरात प्रवेश केला. मागील 11 महिन्यात सात लाख 60 हजार 185 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात आतापर्यंत 57 हजार 319 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक हजार 908 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील कोरोनाची स्थिती
एकूण टेस्टिंग
1,94,780
आतापर्यंत पॉझिटिव्ह
14,257
एकूण मृत्यू
694
बरे झालेले रुग्ण
12,098
जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर शहरात पहिला रुग्ण सापडलेल्या पाच्छा पेठेत अजूनही रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता अशा साध्या-सोप्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वांनीच केले. तरीही नागरिकांकडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचाच परिणाम म्हणून कमी झालेला कोरोना पुन्हा जोर धरू लागला आहे. सोलापूर शहर-जिल्हा पुन्हा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. लॉकडाउन संदर्भात 30 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर जिल्हा परिषद व महापालिकेने आता प्रवेशद्वारावरच कोरोनाची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट सुरु केली आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील संशयितांची टेस्टिंग वाढविली असून शहरात, मात्र टेस्टिंग वाढलेले नाही. 11 महिने होऊनही साडेबारा लाख लोकसंख्येच्या शहरात दोन लाख टेस्टसुध्दा झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात सातत्याने अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, आरोग्यसेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे सुरु झाला आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे तापमान मोजून त्याची नोंद स्वतंत्र नोंदवाहीत ठेवली जात आहे. शहरात, तसा प्रकार पहायला मिळत नाही. रुग्णाकडून त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती लपविण्याचे तथा खोटी माहिती देण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळेच कोरोना वाढीस वाव मिळत असल्याची चर्चा आहे.
ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती
एकूण टेस्टिंग
5,65,405
आतापर्यंत पॉझिटिव्ह
43,062
एकूण मृत्यू
1,214
बरे झालेले रुग्ण
40,242
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.