विवाहीत तरुणाची सोशल मिडियातून झाली अल्पवयीन मुलीशी ओळख ! नववर्षानिमित्त भेटले अन्‌ तरुणाने केला अत्याचार

40Crime_Story_0_25 - Copy.jpg
40Crime_Story_0_25 - Copy.jpg

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर एका विवाहित तरूणाने अत्याचार केला आहे. विवाहित तरुणाला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या तरुणीची सोशल मिडियातून ओळखी झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत तरुणाने त्या मुलीशी जवळीक निर्माण केली. शुक्रवारी (ता. 1) सकाळी कॉलेजला गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरु केली. सायंकाळी उशिरा मुलगी घरी परतली. त्यावेळी तिने आपल्याला एक तरूण घेऊन गेल्याचे पालकांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांनी संशयित तरुणाला फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथून अटक केली आहे. त्या तरुणाचे फताटेवाडी येथे किराणा दुकान असून मुलगी शहरातील असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


प्रवासात महिलेचे 
एक लाखाचे दागिने लंपास

सोलापूर : कार्यक्रमासाठी दागिने घेऊन गाडीतून प्रवास करत असताना महिलेची पर्स चोरट्याने लांबविली. चोरीला गेलेल्या पर्समध्ये एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी तेजस्वीनी राजकुमार बिराजदार (रा. नरेंद्र नगर, विजयपूर रोड) यांनी वळसंग पोलीस ठाण्याता फिर्याद दिली आहे. बिराजदार यांची वडगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे शेती आहे. शेतात बोअर मारल्याने पूजेचे साहित्य घेऊन तेजस्विनी यांना सासऱ्यांनी बोलवले. त्यामुळे तेजस्विनी यांनी अर्धा तोळे वजनाचे सहा अंगठ्या, अर्धा तोळे वजनाचे दोन लॉकेट आणि एक ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी, असे दागिने घेऊन दोन मुलांसह त्या एसटीत बसल्या. प्रवासात दागिने असलेली पर्स चोरीस गेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.


पोलिसांनी वसूल केला 21 लाखांचा दंड
सोलापूर : शहरातील कोरोनाला आवर घालण्याच्या हेतूने शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांसह बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यासाठी होमगार्डची मदत घेतली जात आहे. 17 ऑगस्टपासून पोलिसांनी शहरातील 20 हजार 847 विनामास्क फिरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांकडून 20 लाख 91 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. शनिवारी (ता. 2) 231 नागरिकांकडून 23 हजार 100 रुपये दंड वसूल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com