
आयुक्तांच्या आदेशानुसार...
सोलापूर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे संकट आले आहे. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अंडी व चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले तर तो आजार होत नाही, असे आवाहनही करण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील चिकन विक्रेत्यांना मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक केले आहे. तर मृत पक्षी आढळल्यास पीपीई कीट घालून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही केले आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार...
शहरवासियांनी काही संशय वाटल्यास प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे (8459125211) आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चराटे (9561129393) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सध्या शहर- जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा एकही रुग्ण नसून नागरिकांनी अंडी व चिकन पूर्णपणे शिजवून खावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्यू होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचे संकट टळलेले नसून त्यातच आता बर्ड फ्ल्यूचा आजार काही जिल्ह्यांमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोंबड्या, अंडी विक्रेत्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन हे संकट आपल्याकडे येणारच नाही, असा त्यामागे हेतू आहे.