मास्क, सोशल डिस्टन्सिंगच कोरोनाविरुध्द लढाईतील फायटर ! शहरातील 23 ठिकाणी 27 रुग्ण 

तात्या लांडगे
Monday, 30 November 2020

 

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 21 हजार 670 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आजवर आढळले दहा हजार 387 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 435 संशयितांमध्ये 27 जंणाचे रिपोर्ट आढळले पॉझिटिव्ह 
  • शहरातील नऊ हजार 395 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आज 25 जण झाले बरे 
  • सध्या शहरातील 431 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; 561 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू 

सोलापूर : शहरातील मृत्यू आता थांबले आहेत, परंतु दुसरीकडे टेस्टिंगची संख्या वाढलेली नाही. आज 435 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील दक्षिण कसबा व एमएसईबी कार्यालयाजवळ (मुरारजी पेठ) प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर उर्वरित 23 ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, मास्क, हॅण्डवॉश, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर हेच कोरोनाविरुध्द लढाईतील फायटर आहेत. त्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 21 हजार 670 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आजवर आढळले दहा हजार 387 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 435 संशयितांमध्ये 27 जंणाचे रिपोर्ट आढळले पॉझिटिव्ह 
  • शहरातील नऊ हजार 395 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आज 25 जण झाले बरे 
  • सध्या शहरातील 431 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; 561 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू 

 

शहरात आज बुधवार पेठ, थोबडे वस्ती (देगाव), निर्मिती विहार (विजयपूर रोड), रामलिंग सोसायटी, बसवेश्‍वर नगर (होटगी रोड), दक्षिण कसबा, बुधले गल्ली (बाळीवेस), यशवंत नगर (सिव्हिल लाईन), टिळक चौक, सुंदरम नगर, व्यंकटेश सोसायटी, आनंद अपार्टमेंट (रेल्वे लाईन), मड्डी वस्ती, सुर्या कॉम्प्लेक्‍स, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), डी-मार्टजवळ (पुना रोड), मोदीखाना, काडादी नगर (होटगी रोड), संत तुकाराम नगर (अशोक चौक), एमएसईबी कार्यालयाजवळ (मुरारजी पेठ), अवंती नगर, करंजकर सोसायटी (शेळगी), मुरारजी पेठ, पारशी विहिरीजवळ (नई जिंदगी) आणि रिमांड होमजवळ नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सध्या रुग्णांच्या संपर्कातील 108 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 68 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये तर 42 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masks, observing social distance are the fighters in the battle against Corona! 27 patients found in 23 places in the city