भाविकांनो, सिद्धापूरच्या मातुर्लिंग यात्रेस येऊ नका ! कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा रद्द; प्रशासन व यात्रा कमिटीचा निर्णय 

दावल इनामदार 
Monday, 11 January 2021

मंगळवेढा तालुक्‍यातील सिद्धापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात गणपतीची स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली असून, नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे. भीमा नदीच्या पात्रात आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य देखणे स्थळ म्हणून प्रचिती आहे. दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीस येथे मोठी यात्रा भरते. 

ब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यातील सिद्धापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा बालगणेश म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु यावर्षी कोरोना व्हायरस (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी सिद्धापूरची 14 ते 15 जानेवारी रोजीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोणीही भाविकांनी या कालावधीत दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासन व यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील सिद्धापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा बालगणेश म्हणून प्रसिद्ध आहे. सिद्धापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात गणपतीची स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली असून, नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे. भीमा नदीच्या पात्रात आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य देखणे स्थळ म्हणून प्रचिती आहे. दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीस येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, तेथील पारंपरिक बैलगाडीतून सहकुटुंब दर्शनाला येणारे भाविक लक्ष वेधून घेतात. 

परंतु, यावर्षी कोरोना व्हायरस (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उत्सवांना बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी सिद्धापूरची 14 ते 15 जानेवारी रोजीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची सिद्धापूर येथे यात्रा कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. त्या वेळी सिद्धापूर येथील मातुर्लिंग यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच यात्रा कमिटीतर्फे निवेदन देण्यात आले. तरी यात्रा कालावधीत कोणीही नागरिक देवस्थान ठिकाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maturling Yatra of Siddhapur has been canceled due to corona