कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी पोटभर जेवण ! चार चपाती, 200 ग्रॅम भात अन्‌ 150 ग्रॅम भाजी

1Food_for_Corona_Patient_0.jpg
1Food_for_Corona_Patient_0.jpg

सोलापूर : कोविड केअर सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटरमधील रुग्णांनी जेवण निकृष्ट आणि कमी प्रमाणात मिळत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मक्‍तेदार बदलून टाकला असून आता रुग्णांना शाकाहरी व मांसाहारी मुबलक जेवण पुरविले जाणार आहे.

आयुक्‍तांनी मक्‍तेदार बदलला
कोविड केअर सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना जेवण देणारा मक्‍तेदार आता बदलण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णांचा विचार करून चपाती, भात, भाजीत वाढ करण्यात आली आहे.
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका

शहरातील व्यक्‍तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये तर लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. सोलापूर शहरात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेत प्रशाला, महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि वाडीया हॉस्पिटल याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. तर जुळे सोलापुरातील म्हाडा बिल्डिंगमध्ये इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी तेलगू भाषिकांची संख्या वाढू लागली असून त्यांना भात वाढवून मिळावा, या हेतूने जेवणात भात वाढवून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार कोविड केअर सेंटर व इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना आता चार चपाती, 150 ग्रॅम भाजी, 200 ग्रॅम भात दिला जाणार आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील बाथरूममध्ये शॉवरची सोय आहे. स्नानासाठी गेल्यानंतर शॉवरद्वारे पाण्याचा अधिक वापर होत असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची त्याठिकाणी कमतरता नाही, परंतु स्नानाच्या पाण्याबद्दल तक्रारी येत आहेत. त्यामुळे रुग्णांनी स्नानासाठी पाणी वापरताना जपून वापरावे, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

जेवणाचे नवे दर...
चहा : 5 रुपये
नाश्‍ता : 15 रुपये
एक अंडे : 5 रुपये
शाकाहारी जेवण : 60 रुपये
मांसाहारी जेवण : 64.50 रुपये

सुरेश पाटलांच्या भेटीनंतर आयुक्‍तांचा निर्णय
सिंहगड क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांनी सोशल मिडियातून व नगरसेवकांना कॉल करून तेथील असुविधांबद्दल नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर माजी सभागृहनेता तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी शुक्रवारी (ता. 9) यांनी सिंहगड कॉलेजमधील रुग्णांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर तिथूनच आयुक्‍त, उपायुक्‍तांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 10) महापालिका आयुक्‍तांनी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना जेवण पुरविणारा मक्‍तेदार बदलून टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com