esakal | बाहेरगावी जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट हवे का? मग ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Medical certificate for can be obtained here

सोलापूर जिल्ह्यात बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक यासह अन्य काही राज्यांमधील सुमारे साडेतीन हजार कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. एक महिन्यांहून अधिक दिवसांचा काळ लोटला असून त्यांच्या हाताचे काम बंदच आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

बाहेरगावी जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट हवे का? मग ही बातमी वाचाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : परराज्यातील अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यास केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना महापालिका, शासकीय सर्वोपचार रुग्णालय व सर्व खाजगी रुग्णालयांमधून या कामगारांना मेडिकल सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे त्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये व सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक यासह अन्य काही राज्यांमधील सुमारे साडेतीन हजार कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. एक महिन्यांहून अधिक दिवसांचा काळ लोटला असून त्यांच्या हाताचे काम बंदच आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु, ‌ सध्याचे ठिकाण सोडण्यासाठी त्यांना जवळील पोलिस ठाण्यात त्यांची वैयक्तिक माहिती व कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीत त्यांना सर्दी, खोकला, ताप असे काहीच नाही याचे डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. 3) श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयसमोरील सोलापूर महापालिकेच्या हॉस्पिटलसमोर प्रमाणपत्र घेण्यासाठी परराज्यातील कामगारांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्या कामगारांना सोशल डिस्टन्सचे पालन करा, अन्यथा प्रमाणपत्र न देता घरी हाकलून दिले जाईल, असा इशारा देताच त्यांनी नियमांचे पालन करीत रांग लावली. 

१५ रुग्णालयात व्यवस्था
परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांसह मेडिकल प्रमाणपत्र अर्जासोबत पोलिसांना देणे बंधनकारक आहे. सोलापूर महापालिकेच्या 15 रुग्णालयात प्रमाणपत्र देण्याची सोय केली असून सर्वोपचार रूग्णालयासह शहर जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखान्यातून त्या कामगारांना मेडिकल प्रमाणपत्र घेता येईल.
- डॉ. संतोष नवले, 
आरोग्य अधिकारी, सोलापूर महापालिका