बसवेश्वर स्मारक,तिर्थक्षेत्र विकास आराखडा व भुयारी गटार योजनेबाबत मंत्रालयात बैठक

हुकूम मुलानी
Saturday, 16 January 2021

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यावेळी त्यांनी त्यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात त्यांना निवेदन देत या प्रलंबित प्रश्नास न्याय मिळवण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याबात विनंती केली असता त्यांनी यावर लवकरच हा प्रश्न मंत्रालयात बैठक लावून मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याचे नगराध्यक्षा माळी यांनी सांगितले.

मंगळवेढा (सोलापूर) :  बसवेश्वर स्मारक,तिर्थक्षेत्र विकास आराखडा,भुयारी गटार योजनेसह नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्तावाबाबत मंत्रालयात लवकरच बैठक लावून मार्गी लावणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी दिली.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यावेळी त्यांनी त्यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात त्यांना निवेदन देत या प्रलंबित प्रश्नास न्याय मिळवण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याबात विनंती केली असता त्यांनी यावर लवकरच हा प्रश्न मंत्रालयात बैठक लावून मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याचे नगराध्यक्षा माळी यांनी सांगितले.सध्या शहरातील 357 घरकुल लाभार्थाचा केंद्र शासनाचा रखडलेला निधी,टाऊन हाॅलच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा.तसेच भुयारी गटार योजना राबवण्यासाठी 42 कोटी 50 लाखांच्या प्रस्ताव, महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहे. तो प्रश्न मार्गी लावल्यावर शहराच्या पर्यटनात वाढ होणार आहे  शिवाय रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.17 संताचे वास्तव्य असलेल्या संत नगरीच्या विकासासाठी तिर्थ क्षेत्र  विकास आराखड्याच्या माध्यमातून निधीची आवश्यकता आहे. शहरातील बराचसा भाग हा शहराबाहेर असल्यामुळे तो भाग शहरात समाविष्ट होणे गरजेचे आहे त्यामुळे नव्याने हद्दवाढ मंजूर केल्यास कर रूपाने मिळकतीत वाढ होणार आहे. या सर्व रखडलेल्या प्रश्नाच्या संदर्भात संदर्भातील निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागण्याचे सूतोवाच मिळाल्याचे नगराध्यक्षा माळी यांनी सांगितले.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting at the Ministry regarding Basaveshwar Memorial, Pilgrimage Development Plan and Underground Sewerage Scheme