ग्रामीणमध्ये पुरुषच कोरोनाचे सर्वाधिक बळी ! आज 154 पॉझिटिव्ह; दोन महिला, दोन पुरुषांचा मृत्यू 

3more_20than_2014_20hundred_20new_20patient_20found_20in_20nashik_20marathi_20news (2).jpg
3more_20than_2014_20hundred_20new_20patient_20found_20in_20nashik_20marathi_20news (2).jpg
Updated on

सोलापूर : शहरातील कोरोनाची स्थिती कमी- अधिक होत असतानाच ग्रामीणमधील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाल्याचे दिसत नाही. आज (मंगळवारी) ग्रामीण भागात 154 नव्या रुग्णांची भर पडली असून वेळापूर, टेंभूर्णी, तिऱ्हे व सिध्दापूर येथील चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 21 हजार 393 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 731 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात आज बार्शीत 13, करमाळ्यात चार, माढ्यात सहा, माळशिरसमध्ये 23, मंगळवेढ्यात 14, मोहोळमध्ये दहा, उत्तर सोलापुरात तीन, पंढरपुरात 61, सांगोल्यात 14 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सहा रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 34 हजार 550 रुग्ण आढळले असून त्यापैकी एक हजार 18 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 13 हजार 157 महिला आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यातील 287 महिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस या चार तालुक्‍यांतील रुग्णसंख्या व मृत्यूचा दर अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत सर्वाधिक राहिला आहे. दरम्यान, रुग्णांच्या संपर्कातील 11 हजार 599 संशयित सध्या होम क्‍वारंटाईन असून दोन हजार 543 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. ग्रामीण भागातील 41 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून उद्या (बुधवारी) त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील तीन लाख 11 हजार 396 संशयितांची कोरोना टेस्ट पार पडली आहे. 

तालुकानिहाय रुग्ण व मृत्यू 

  • तालुका             रुग्ण        मृत्यू 
  • अक्‍कलकोट      1150       69 
  • बार्शी                6200      182 
  • करमाळा           2127       51 
  • माढा                3618       115 
  • माळशिरस        6194      129 
  • मंगळवेढा          1569       46 
  • मोहोळ              1708       85 
  • उत्तर सोलापूर      763       37 
  • पंढरपूर             7020       208 
  • सांगोला              2693      45 
  • द. सोलापूर        1508       51 
  • एकूण              34,550     1,018 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com