ऍसिड हल्ल्याची धमकी देऊन युवतीचा मानसिक छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 

अक्षय गुंड 
Wednesday, 2 September 2020

तुझ्या अंगावर ऍसिड टाकू असे सांगून दमदाटी करून मानसिक छळ करून उपळाई खुर्द (ता. माढा) येथील एका अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : फोनवरून दमदाटी करून तू आम्हाला आवडतेस तुझ्यावर आमचे प्रेम आहे. तुझ्या बरोबर लग्न करायचे आहे. तुला पळवून नेऊ व नाही आली तर तुझे फोटो इंटरनेटवर व्हायरल करून तुझी बदनामी करू. तुझ्या अंगावर ऍसिड टाकू असे सांगून दमदाटी करून मानसिक छळ करून उपळाई खुर्द (ता. माढा) येथील एका अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब मधुकर अनभुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 
उपळाई खुर्द येथील प्रिती सुधाकर अनभुले (वय 17) हिने ता. 31 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिचे चुलते चंद्रकांत उर्फ बाळासाहेब मधुकर अनभुले (रा. उपळाई खुर्द) यांनी बुधवारी माढा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रिती सुधाकर अनभुले हिला विराज विजय कदम व विक्रम विलास बोराडे (दोघे रा. उपळाई खुर्द) यांनी वेळोवेळी गावांमध्ये व कॉलेजमध्ये अडवून फोनवरून दमदाटी करून तू आम्हाला आवडतेस तुझ्यावर आमचे प्रेम आहे. तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे. तुला पळवून नेऊ व नाही आली तर तुझे फोटो इंटरनेटवर व्हायरल करून तुझी बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच तुझ्या अंगावर ऍसिड टाकू, असे सांगून तिला दमदाटी करून तिचा मानसिक छळ केला व तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रितीने ता. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमूल कादबाने करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental harassment of a young woman by threatening acid attack Charges filed against both for inciting suicide